Jalgaon Vegetable Market: राज्यात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या भरीताच्या वांग्याची आवक विविध बाजारांत सतत वाढत आहे. बाजारात शेतकऱ्यांना प्रतिकिलो १५ ते २० रुपये व सरासरी १८ रुपये असा दर मिळत आहे. विविध कार्यक्रमांच्या मेजवानीत भरीताचा मेनू दिसू लागला आहे. पण आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसत आहे..भुसावळातील पिंपळगाव, तळवेल, वरणगाव, शिंदी, पिंप्रीसेकम या भागातही भरीत वांग्यांचे उत्पादन होत आहे. तेथेही काढणी जोमात आहे. जळगावमधील आसोदा, तरसोद, नशिराबाद, बेळी, जळगाव खुर्द, तुरखेडा, विदगाव या भागातही भरीत वांग्यांचे उत्पादन येत असल्याचे चित्र आहे..Bharit Brinjal Market: जळगावच्या भरीत वांग्यांची आवक सुरू.भरीताच्या वांग्यांची आवक थंडीत अधिक असते. यंदा पिकास अनुकूल वातावरण राहिले. दिवाळीच्या काळात आवक बऱ्यापैकी होती. भुसावळ, जळगाव भागात आवक सुरू आहे. यावल, रावेर, जळगाव भागातील आठवडी बाजारांत भरीताच्या वांग्यांना चांगली मागणी आहे.Brinjal Pest: वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी.गोलाकार, मोठ्या आकारातील भरीताची वांगी येत आहेत. तसेच भडगाव, एरंडोल, जामनेर भागातही काही शेतकऱ्यांनी भरीत वांगी पिकाची लागवड केली आहे. तेथेही आवक सतत वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात मिळून रोज १०० ते १२५ क्विंटल भरीत वांगी आवक होत असल्याचा अंदाज बाजारपेठेतील जाणकार व्यक्त करीत आहेत..बामणोद, मस्कावदमधील वांगी मुबलकऑक्टोबरच्या अखेरीस यावल, रावेर या भागात भरीतांच्या वांग्यांची आवक, काढणी सुरू झाली आहे. यावलमधील बामणोद, पाडळसे, भालोद, सांगवी खुर्द, न्हावी, रावेरातील मस्कावद भागात भरीत वांगी उत्पादन चांगले आहे. सध्या जळगाव, भुसावळ येथील बाजारांत भरीत वांग्यांची सर्वाधिक आवक होत आहे. जळगावात रोज ३५ ते ४० क्विंटल भरीताच्या वांग्यांची आवक होत आहे. किरकोळ बाजारातील दर २०, ३० ते ५० रुपये प्रति किलो असे आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.