Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : खानदेशात अपवाद वगळता सर्वदूर पावसाची हजेरी

Monsoon Rain : खानदेशात या महिन्यात सरासरीच्या ९६ टक्क्यांवर पाऊस झाला आहे. शुक्रवारी (ता.२८) खानदेशात काही भागांचा अपवाद वगळता सर्वदूर पाऊस झाला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात या महिन्यात सरासरीच्या ९६ टक्क्यांवर पाऊस झाला आहे. शुक्रवारी (ता.२८) खानदेशात काही भागांचा अपवाद वगळता सर्वदूर पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला असून, पेरण्या यशस्वी होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

खानदेशात पेरण्यादेखील ८० टक्क्यांवर झाल्या आहेत. यापूर्वीही पाऊस झाला. पण काही भागात पाऊस होता, तर काही भागात नव्हता. कमी अधिक अशी स्थिती पावसाची होती. पाऊस येईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीला गतीही होती. मध्यंतरी पाच ते सहा दिवस पावसाचा खंड होता.

यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली होती. परंतु गुरुवारी (ता.२७) जळगाव जिल्ह्यात चोपडा, एरंडोल, जळगाव, धरणगाव, धुळ्यातील धुळे, साक्री भागात पाऊस झाला. शुक्रवारीदेखील सायंकाळी सर्वत्र संततधार पाऊस झाला. शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल, नंदुरबारातील शहादा, धुळ्यातील धुळे, साक्री आदी भागात पाऊस झाला.

सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री आठ - नऊपर्यंत सुरू होता. काही भागात मध्यम ते काही भागात संततधार अशी पावसाची स्थिती होती. रात्रीही तुरळक पाऊस काही भागात होत होता. यामुळे जमिनीत ओलावा वाढणार आहे. जळगाव जिल्ह्यात ७६५ मिलिमीटर एकूण पाऊस पडतो. धुळ्यात ५६५ आणि नंदुरबारात सुमारे ८२५ मिलिमीटर एकूण पाऊस पडतो.

यात जूनमधील एकूण सरासरीच्या ९६ टक्क्यांवर पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला आहे. जळगाव, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, चोपडा या भागांत जूनमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक एकूण पाऊस झाला आहे. खानदेशातील अन्य तालुक्यांतही पाऊसमान बऱ्यापैकी असल्याची माहिती मिळाली.

पेरणीवर पाऊस

खानदेशात मागील दोन - तीन दिवस पेरण्या सतत सुरू होत्या. पेरण्यांना गती आली. त्यावर पावसाची गरज होती. गुरुवारी व शुक्रवारी पाऊस झाल्याने या पेरण्यांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. काही भागात १५ जूननंतर पेरणी झाली होती. त्यावर तुरळक पाऊस आला. या पिकांवरही चांगल्या पावसाची गरज होती. या पेरण्यांनादेखील हा पाऊस लाभदायी ठरणार आहे.

वाफसा नाहीसा

पावसाने वाफसा नाहीसा झाला आहे. यामुळे शनिवारी (ता.२९) अनेक भागातील पेरणी, आंतरमशागतीची कामे ठप्प झाली. तसेच केळी, पपईची काढणीदेखील रखडली. केळी अनेक भागात काढणीवर आहे.

पक्व केळीची काढणी रखडल्यास पुढे तिचे नुकसान होते. यामुळे काही केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाफसा होण्याची प्रतीक्षादेखील आहे. ज्या शेतकऱ्यांचे केळी, पपई पीक मुख्य, डांबरी रस्त्यांवर आहे, तेथे काढणी सुरू आहे. परंतु चिखलमय, कच्च्या रस्त्यांच्या भागात केळी काढणी रखडणार असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT