Rain Update : कोकण, पूर्व विदर्भात जोरदार पावसाची हजेरी

Rain News : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. कोकण, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. कोकण, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत चंद्रपूरातील जेवती, पाटण मंडलांत सर्वाधिक १७३.५ मिलिमीटर पाऊस पडला.

यामुळे खरिपातील पिकांना आधार मिळत असून पिकांची वाढ काही ठिकाणी चांगली आहे. जोरदार पावसामुळे कोकण, पूर्व विदर्भात व कोकणात ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. नद्या चांगल्याच वाहत्या झाल्या आहेत. कोकणातील अनेक धरणांत पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे भात रोपांची वेळेवर लागवड होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील मुंब्रा मंडलात ७८.०, ठाणे ७४.८ मिलिमीटर पाऊस पडला.

रायगडमधील माणगाव, इंदापूर मंडलात ९६.८, बोरलीपंचटण ९४, नांदगाव ८७.०, चानेरा ८६.५, वालवटी ८४.८, खामगाव येथे ८४.५ मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरीतील हेदवी मंडलात ९७.८, ओणी ९६.८, जयगड ९२.८, कुंभवडे ८७, नाटे ८७.८, तर सिंधुदूर्गमधील पडेल ९५.३, मदुरा येथे ८४.० मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update
Rain Update: आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

खानदेशात जळगावमधील भोकर मंडलात ५६.३, सोनवद येथे ५९.० मिलिमीटर पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील वेल्हा मंडलात ६९.५ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर ५२.०, लामज ५७.८, कोल्हापुरातील गगनबावडा ५४.५, तर कडेगाव येथे ५४.० मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात पाऊस नाही. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे.

मराठवाड्यात पाऊस नसल्याने पिके पाण्यावर आली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. विदर्भात बुलडाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला.

बुलडाण्यातील सोनाळा मंडलात ४६.८ मिलिमीटर, अमरावतीतील शिवणी ५७.३, मंगरूळ ९८.३, धानोरा ४८.५, माहुली येथे ५२.३ मिलिमीटर, वर्ध्यातील गिरड मंडलात ७८.८, कोरा ७०.३, गोंदिया : काट्टीपूर ६३.३, तिगाव ६३.८, ठाणा ७०.८, गडचिरोलीतील कुनपाडा ५१.८, बामणी ५३.८, अहेरी ५७, तर खामनचेरू येथे ६६.३ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update
Rain Update : कोकणात पुन्हा वाढला पावसाचा जोर

यवतमाळमधील मोझर येथे ७७.० मिलिमीटर, लडखेड, महागाव ७५.५, लोहारा ६५, तर बोरी येथे ६१ मिलिमीटर पाऊस पडला. नागपुरातील मकरधोकडा ८५.५, हेवंती ८५.५ मिलिमीटर पाऊस पडला. चंद्रपूरातील राजुरा ९५, पडोली ८५.५, बल्लारपूर ७७.५ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेती कामांना वेग आला आहे.

१०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेली मंडले

म्हसला १२६.८, तला १२४.८, शिर्शी ११५.०, आबलोली १०३.३, पावस १०३.५, वेतोरे १२१.८, पार्डी १०३.५, हुडकेश्‍वर १०३.५, दिघोरी १०३.५, खाट १०९, कोडामेंडी १०९.०, सडक अर्जुनी ११०.८, मूल ११५.५, बेंबळ ११४.३, खडसंगी ११५.३, मासाळ बु ११४.३, चामोर्शी ११२.५, भेंडाळा ११४.३, तरडगाव १०३.८, भामरागड ११७.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com