Agricultural Demonstrations Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : मोहोळमध्ये यंदा १९ हजार हेक्टर खरीप पेरणीची तयारी

Agricultural Demonstrations : येत्या खरीप हंगामासाठी मोहोळ तालुक्याचा कृषी विभाग सज्ज झाला असून, १९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकाची पेरणी अपेक्षित आहे.

Team Agrowon

Solapur News : येत्या खरीप हंगामासाठी मोहोळ तालुक्याचा कृषी विभाग सज्ज झाला असून, १९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकाची पेरणी अपेक्षित आहे. चालू वर्षी शेतकऱ्यांना केवळ माहिती देण्यापेक्षा प्रात्यक्षिकासह जनजागृतीपर उपक्रमावर भर दिला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांनी दिली.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप पूर्वमशागतींना वेग आला असून, त्यात नांगरणी, कुळवणी, रोटर, सरी आदीचा समावेश आहे. शेतकरी पावसाची चातका सारखी वाट पाहत आहे. चालू वर्षी कृषी विभाग उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढीसाठी बियाण्यांच्या सुधारित वाणांची निवड, बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, हुमणी आळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे आदीसह अन्य महत्त्वाच्या बाबींवर कार्यक्रम घेत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन व गावागावांत शेतकरी मेळावे घेऊन जमिनीच्या सुपीक निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर, मूलस्थानी जलसंधारण, बीबीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करणे, या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

‘पक्की पावती घ्यावी’

खते व बियाणे खरेदी करताना त्याची दुकानदारांकडून पक्की पावती घ्यावी. पिशवी खालच्या बाजूने फोडून त्यात थोडे बियाणे शिल्लक ठेवावे. अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात, काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.

भरारी पथकाची नेमणूक

खते, औषधे, बियाणांबाबत तक्रार आल्यास प्रत्यक्षात त्याच्या शेतावर जाऊन भेट देणे व तपासणी करून पुढील कारवाईची प्रक्रिया पार पाडणे, यासाठी भरारी पथकाची नेमणूक केल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT