Animal Pregnancy kit Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Pregnancy kit : जनावरांतील गर्भधारणा तपासण्यासाठी प्रेगनन्सी किट

महिलांमध्ये गर्भधारणेची खात्री होण्यासाठी जसा प्रेगनन्सी किटचा वापर केला जातो तसाच आता गाई, म्हशींतील गर्भधारणेची खात्री करण्यासाठी प्रेगनन्सी किट विकसीत करण्यात आले आहे.

Team Agrowon

महिलांमध्ये गर्भधारणेची खात्री होण्यासाठी जसा प्रेगनन्सी किटचा वापर केला जातो तसाच आता गाई, म्हशींतील गर्भधारणेची खात्री करण्यासाठी प्रेगनन्सी किट (Animal Pregnancy kit) विकसीत करण्यात आले आहे.  जनावरांमध्ये कृत्रिम रेतन (Artificial Incemination) किंवा नैसर्गिक रेतन (Natural Incimination) केल्यानंतर गर्भधारणेच्या खात्रीसाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र आता अमेरिकेतील आयडिइएक्स लॅबोरेटरी (IDEEX laboratory, USA) या कंपनीने तयार केलेल्या प्रेगनन्सी किटमुळे जनावरांच्या रक्ततपासणीद्वारे (Blood Checking) २८ दिवसातच गर्भधारणेचे खात्रीलायक निदान होणार आहे. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघामार्फत या किटची तपासणी करुन प्रायोगीक तत्वावर अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

किटद्वारे गर्भधारणेचे निदान कसे होते?

रॅपिड व्हिज्युअल प्रेगनन्सी टेस्ट किट या नावाने हे प्रेगनन्सी किट अमेरिकेतील मे.आयडिइएक्स लॅबोरेटरी या कंपनीने तयार केलं आहे. जनावराचे केवळ २ मिली रक्त घेऊन रिएजन्ट कीट मध्ये तपासून जर निळा रंग आला तर गर्भधारणा झाली आहे असे समजते आणि पांढरा रंग आला तर गर्भधारणा झाली नाही असे समजले जाते. त्यामुळे जनावर गाभण आहे किंवा नाही हे केवळ २८ दिवसात समजते. या किटमध्ये एकावेळी ९६ रक्ताच्या नमुन्यांचे निदान करता येईल. अशी माहिती गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक डॉ. प्रकाश दळवी यांनी दिली. 

गोकुळ दूध संघामार्फत किटची तपासणी 

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघामार्फत या किटची तपासणी करण्यात आाली. यासाठी २२ जनावरांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यातील आलेले निदान ३ महिन्यानंतर पुन्हा तपासणी करुन पाहिल्यावर अगदी १०० टक्के बरोबर आले. अशाप्रकारे या किटची सत्यता पडताळून  मगच दूध संघाकडून २५ टक्के अनुदानावर जनावरांच्या गर्भधारणेचे निदान केले जात आहे. याला पशुपालकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या किटची मूळ किंमत २४४ रुपये आहे. अनुदान मिळून हेच किट पशुपालकांना १८४ रुपयांना मिळणार आहे. दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेत हे निदान करुन मिळणार आहे. यासाठी पशुपालकांना केवळ जनावराच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत आणून द्यायचा आहे. हे किट नविन असल्यामुळे याबद्दल अजून बऱ्याच पशुपालकांना माहिती नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यात या किटचा जास्तीत जास्त प्रसार झाल्यास पशुपालकांना त्याचा फायदा होऊ शकेल.  

प्रेगनन्सी किटचे फायदे काय आहेत?

रक्ततपासणीद्वारे २८ दिवसातच गर्भधारणेचे खात्रीलायक निदान होणार आहे. त्यामुळे जनावराचा भाकड काळ कमी करण्यास मदत होणार आहे. पशुपालकाला गाभण जनावराची वेळेवर योग्य ती काळजी घेता येईल. याशिवाय दुग्धव्यवसाय फायदेशीर होण्याकरिता जनावरापासून जास्तीत जास्त वेत मिळवणे शक्य होणार आहे.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT