Team Agrowon
पावसाळ्यात शेळ्यांचे गाभण राहण्याचे तसेच विण्याचे प्रमाण इतर ऋतूपेक्षा जास्त असते.
गाभण काळातील शेवटचा किमान १ महिना व्यायच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करावा.
शक्यतो पावसाळ्यात गाभण शेळ्यांना सुका चारा द्यावा जसे कि भरडलेला मका, गहू सोयाबीन यांचे मिश्रण करून द्यावे.
पावसाळ्यात शेळ्यांना गर्भपात, अंग बाहेर येणे, पोटफुगी, आंत्रविषार, बुळकांडी, अपचन, अशा प्रकारचे आजार उद्भवतात.
आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेळ्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरांमध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होतात.
शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाभण शेळीच्या आरोग्य व व्यवस्थापनेला सुद्धा आहे.