Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Cotton Cultivation: खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू

Agriculture Department Advice: खानदेशात मेअखेरपासून पूर्वहंगामी कापसाची लागवड सुरू झाली असून काही भागांत बीजांकुरणही झाले आहे. मात्र, पुरेशा पावसाविना कोरडवाहू कापूस लागवड न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात मे अखेरीस पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड सुरू झाली आहे. काही भागात कापूस पिकात बिजांकुरण झाले आहे. परंतु चांगला पाऊस झाल्याशिवाय कोरडवाहू कापूस लागवड टाळा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

खानदेशात यंदा पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवडीस प्रतिसाद कमी आहे. कापूस पीक तोट्याचे, अल्प नफ्याचे ठरत आहे. मजूरटंचाईचा मोठा फटका कापूस पिकासंबंधी बसतो. कारण कापसात तीन ते चार फवारण्या, तीन ते चार वेळेस तणनियंत्रण करावे लागते. दुसरीकडे दसरा, दिवाळी सणाच्या वेळेस कापूस वेचणी सुरू होते.

सणासुदीचे दिवस असतानाच शेतात कापूस हंगाम सुरू होतो आणि मजूरटंचाईचा मोठा फटका बसतो. मजुरीदर वाढतात. या सर्व कारणांनी खानदेशात कापसाखालील क्षेत्रात मागील दोन वर्षांत मोठी घट झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील लागवड ५० हजार हेक्टरने मागील हंगामात कमी झाली.

यंदाही तशीच स्थिती आहे. काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन, मका पेरणी करून पुढे त्यात हरभरा व अन्य रब्बी पिके घेण्याचे नियोजन अनेक कापूस उत्पादकांनी केले आहे. परंतु हलक्या, मध्यम जमिनीत कापूस लागवड सुरू आहे. संबंधित शेतकरी ठिबकवर कापूस लागवड करीत असून, पुढे त्यात मका व अन्य पिके घेवू, असे नियोजन करीत आहेत.

सातपुडालगत लागवड अधिक

खानदेशात पूर्वहंगामी कापसाची लागवड तापी नदीसह अनेर नदीकाठी लागवड दिसत आहे. ही लागवड मागील तीन ते चार दिवसांत झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा तसेच जामनेर, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारातील तळोदा व शहादा, नंदुरबार भागातही पूर्वहंगामी लागवड झाली आहे. तसेच ही लागवड सुरूच आहे. या आठवड्यात लागवड वेग घेईल. मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी लागवड बऱ्यापैकी होईल. १० जूनपर्यंत अपेक्षित लागवड अनेक भागात होईल, अशी माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

Kharif Season: खरीप पिकांच्या ७० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

Mahua Flower: मोहफुलाच्या विक्रीतून पोटापाण्याची सोय

Solar Pump Scheme: मध्य प्रदेशचे वर्षभरात २ लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट

Stone Artisans in Palghar: पोटासाठी दगडावर घाव

SCROLL FOR NEXT