
Parbhani : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२५) खरिपात कपाशीची २ लाख ७ हजार ८८५ हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक कपाशीच्या विविध वाणांच्या ११ लाख ४३ हजार ३३८ बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. आजवर ९ लाखांवर बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. बियाणे पाकिटाची किमान किरकोळ किंमत प्रतिपाकीट ९०१ रुपये आहे. गुरुवारपासून (ता. २२) पासून बियाणे विक्री सुरू झाली असून पुरवठा झाल्यापैकी सुमारे २५ टक्के बियाणे पाकिटांची विक्री झाली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.
परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामातील कपाशी हे प्रमुख नगदी पीक असून मागील ५ वर्षातील कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार ९५५ हेक्टर आहे. गतवर्षीच्या (२०२४) खरिपात जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ९८६ हेक्टरवर (१०३ टक्के) कपाशीची लागवड झाली होती. त्या तुलनेत ९ हजार ८९९ हेक्टरने वाढ गृहित धरून सुधारित अंदाजानुसार यंदा २ लाख ७ हजार ८८५ हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे.
बी.टी. कपाशी लागवड करताना दोन झाडांतील अंतर कमी करण्याचा शेतकऱ्यांचा कल आहे. यंदाच्या प्रस्तावित क्षेत्रावर लागवडीसाठी कपाशीच्या विविध वाणांच्या बियाण्यांच्या ११ लाख ४३ हजार ३६८ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात कपाशी बियाण्यांच्या १ लाख ३५ हजार पाकिटांचा तर २०२४-२५ मध्ये १ लाख ४८ हजार पाकिटांचा पुरवठा करण्यात आला होता.
शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने मागणी असलेल्या आरसीएच ६५९, ७७९, अजित १५५, १९९, मल्लिका, महिको ७३५१, जादू, एटीएम यासह इतर वाणांच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत यंदा सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. विविध वाणांच्या ९ लाखांवर बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला आहे, असे सामाले यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्यात कपाशी वाण बियाणे पाकिटे मागणी स्थिती
वाण बियाणे पाकिटे मागणी
अजित - १५५ १४५००
अजित - १९९ १५०००
अजित - १११ १३०००
आशा १२०००
भक्ती ११५००
राजा १०२००
बलवान १२५००
वेदा ७७०००
तुलशी - ९ ४३०००
नंदी ३६५००
राशी - ६५९ ७३५००
राशी - ७७९ ७१०००
यूएस - ४७०८ ७१०००
विठ्ठल १००००
आर्या ६८००
जादू ६६०००
इतर वाण ५९९८६८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.