Seed Demand Maharashtra: हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२६ मध्ये बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. सार्वजिक व खाजगी क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे विविध पिकांच्या ७० हजार ३५२ क्विंटल बियाणे आणि कपाशीच्या २ लाख ५ हजारांवर बियाणे पाकिटांची मागणी केली असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये ३ लाख ३९ हजार २१८ हेक्टरवर पेरणी झाली होती. कृषी विभागाच्या अंदाजानुसार आगामी २०२६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार ८५४ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार बिजोत्पादकांकडे ७० हजार ३५२ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील (महाबीज,राष्ट्रीय बियाणे महामंडळ) बियाणे उत्पादकांकडे ८ हजार ९६० क्विंटल आणि खाजगी बियाणे कंपन्यांकडे ६१ हजार ३९२ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. .Kharif Intercropping: खरीप हंगामात नाचणी पिकामुळे दिलासा. खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची २ लाख ५८ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी ६७ हजार ७२५ क्विंटल बियाणे मागणी करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक बिजोत्पादकांकडे ८ हजार ५८६ क्विंटल आणि खाजगी बियाणे कंपन्यांकडे ५९ हजार १३९ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातून १ लाख ५० हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होऊ शकेल. घरगुती बियाणे वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे. तुरीची ३८ हजार हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. .त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे २३५ क्विंटल आणि खाजगी बियाणे उत्पादकांकडे १ हजार ७६० क्विंटल मिळून एकूण १ हजार ९९५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. मुगाचे प्रस्तावित क्षेत्र ४ हजार ५०० हेक्टर असून ९९ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. उडदाचे प्रस्तावित क्षेत्र ३ हजार ३०० हेक्टर असून १४० क्विंटल बियाण्याची मागणी आहे. ज्वारीचे प्रस्तावित क्षेत्र १ हजार ९०० हेक्टर असून बियाण्याची मागणी १४२ क्विंटल आहे. .Kharif Crop Insurance : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किती विमा भरपाई मंजूर झाली.बाजरीचे प्रस्तावित क्षेत्र २०० हेक्टर असून बिण्याची मागणी ६ क्विंटल आहे. मक्याचे प्रस्तावित क्षेत्र ४५० हेक्टर असून ६७ क्विंटल बिण्याची मागणी आहे. तिळाचे प्रस्तावित क्षेत्र ५२ हेक्टर असून ७२ किलो बियाण्याची मागणी आहे. सूर्यफुलाचे प्रस्तावित क्षेत्र ११ हेक्टर असून ८३ किलो बियाण्याची मागणी आहे. भुईमुगाच्या प्रस्तावित १५० हेक्टरसाठी १५० क्विंटल बिण्याची मागणी आहे. इतर पिकांचे प्रस्तावित क्षेत्र २९१ हेक्टर असून त्यासाठी ५० क्विंटल बियाण्याची मागणी आहे..कपाशी बियाण्याच्या २ लाख ५ हजार पाकिटांची मागणी...कपाशीची ४१ हजार हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी विविध वाणांच्या २ लाख ५ हजार बियाणे पाकिटांची मागणी खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..हिंगोली जिल्हा खरीप२०२६ प्रस्तावितपेरणी क्षेत्र( हेक्टर),बियाणे (क्विंटल) मागणी स्थितीपीकाचे नाव ---प्रस्तावित पेरणी क्षेत्र-- बिण्याची मागणीसोयाबीन २५८००० ६७७२५तूर ३८००० १९९५मूग ४५०० ९९उडिद ३३०० ११५ज्वारी १९०० १४२बाजरी २०० ६मका ४५० ६७भुईमूग १५० १५०तिळ ५२ ०.७२सूर्यफूल ११ ०.८३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.