Solar Pump Scheme News Updates: मध्य प्रदेश सरकारने आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत शेतकऱ्यांसाठी शेतात सुमारे २ लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अधिकाऱ्यांना, सौर पंपांच्या वापराला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि सौर ऊर्जा योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. .राज्य सचिवालयात त्यांनी नुकताच नवीकरणीय ऊर्जा योजनांचा आढावा घेतला. यावेळी पीक उत्पादन क्षमता आणि ग्रामीण उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना अखंडित आणि परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले..त्यांनी अधिकाऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे तसेच सौर ऊर्जा यंत्रणेसाठी शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांचा विजेवर होणारा खर्च वाचेल, उत्पादन क्षमतेत वाढ होईल, असे त्यांनी म्हटले आहे..Solar Pump Scheme: सौर कृषी पंपाचे नुकसान झाल्यास किती वर्षे मोफत दुरुस्ती, नियम काय सांगतो?.राज्याने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियमितपणे आढावा घेणे आणि नवीन गरजा लक्षात घेऊन त्यांत सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. त्यांनी 'पीएम सूर्य घर रूफटॉप सोलर योजने'ला गती देण्याचेही आवाहन केले आहे. .Solar Pump Scheme: 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'साठी अर्ज करण्याची मुदत आहे का? .मध्य प्रदेशात सूर्यमित्र शेती फीडर योजनेअंतर्गत (KUSUM-B) सुमारे २७,१०० सौर पंप यापूर्वीच बसवण्यात आले आहेत. तसेच पुढील दोन वर्षांत ४ लाख पंप सौरऊर्जेवर आणण्याचे राज्य सरकारचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात जवळपास १ लाख अर्ज आले आहेत..कुसूम- सी अंतर्गत ४९३ उपकेंद्रांद्वारे सुमारे १० लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत, संपूर्ण राज्यात अडीच लाख सौर पंप बसवण्यात आले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.