
Beed News : तालुक्यात अवकाळीचा २५ दिवस मुक्काम राहिल्याने शेतजमीनीतील ओलावा अन् पुढील मॉन्सूनच्या पावसाच्या भरवशावर साधारण ३०० हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. यंदा देखील गेवराईतील शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीकडे अधिक कल आहे, असा कृषी विभागाकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गेवराई तालुक्याचे शेत जमिनीचे भौगोलिक क्षेत्र जवळपास दीड लाख हेक्टरच्या आसपास आहे. यात पेरणीयोग्य १ लाख ३५ हजार एवढे क्षेत्र असले तरी साधारण १ लाख १० हजार हेक्टरवर खरिपाचे पिके बहरतील, असा अंदाज कृषी विभागाकडून सांगण्यात आला आहे. मागील वर्षी तब्बल अकरा वर्षानंतर मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली.
मात्र, पुढे सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टीने गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे अधिक उत्पन्नाचे स्वप्न धुळीस नेले. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी यामुळे शेतकरी हतबल झाला. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने प्रारंभ केला. अवकाळी असल्याने आज बंद होईल उद्या बंद होईल यावर राहिलेल्या शेतकरी यांच्या शेतमशागतीवर तब्बल पंचवीस दिवस अवकाळीने मुक्काम ठोकल्याने शेतमशागतीच्या कामाला ब्रेक तर लागला.
मात्र, त्यापूर्वीच ज्या शेतकऱ्यांची शेतमशागत झाली. अशा शेतकऱ्यांनी शेत जमिनीत झालेला ओलावा आणि पुढील पावसाच्या भरवशावर साधारण तालुक्यात ३०० हेक्टरवर कपाशी लागवड करण्यात आली. यंदा ही तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक कपाशीला पसंती राहणार आहे.
पेरणीची घाई नको : कृषी विभाग
अवकाळीने शेत जमिनीत ओलावा भरपूर झाल्याने बहुतेक शेतकरी पेरणीची घाई करताना दिसत आहेत. काहींनी कापूस लागवड देखील केली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, मृग नक्षत्र लागण्यास आणखी काही दिवस बाकी असून, पावसाची प्रतिक्षा करावी. एवढेच नाही तर बियाण्यांची निवड करताना एकाच वाणाचा हट्ट धरु नये यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
...असे असणार खरीप
पेरणी नियोजन
पीक पेरा (हेक्टरवर)
कापूस ७८०००
तूर १३०००
सोयाबीन १०२३०
मुग ४५०८
उडीद १२४
मका ५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.