Grape farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Disease Management : उपाययोजना अभ्यासून रोगनियंत्रण गरजेचे

Kharif Season : यंदा पहिल्यांदाच खरड छाटणी झाल्यानंतर मॉन्सूनपूर्व पावसामुळे द्राक्षबागा अडचणीत सापडल्या आहेत. एक महिना अगोदर पाऊस झाला. यापूर्वी असे नुकसान झालेले नाही.

Team Agrowon

Nashik News : यंदा पहिल्यांदाच खरड छाटणी झाल्यानंतर मॉन्सूनपूर्व पावसामुळे द्राक्षबागा अडचणीत सापडल्या आहेत. एक महिना अगोदर पाऊस झाला. यापूर्वी असे नुकसान झालेले नाही. सध्या करपा, डाऊनी व भुरीचा प्रादुर्भाव वाढता आहे.

बागा रोगग्रस्त झाल्या आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी अनुभवलेली नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थिती बागेचे व्यवस्थापन करताना उपाययोजना अभ्यासून पुढे जाण्याची गरज आहे, असे आवाहन प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघाचे तज्ज्ञ संचालक गणेश मोरे यांनी केले.

‘सकाळ-ॲग्रोवन’ व ‘एचडीएफसी बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता. २९) रोजी के. के. वाघ शैक्षणिक संकुल, काकासाहेब नगर (ता. निफाड, जि. नाशिक) येथे ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ‘सद्याच्या परिस्थितीतील द्राक्ष बागेचे नियोजन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मोरे बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्कर भगरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, के. के. वाघ शिक्षण संस्थेच जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, ‘एचडीएफसी’ बँकेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अमोल शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी सुनील चव्हाण(रेडगाव), सुभाष जाधव(वावी), संतोष मोरे (नांदूर खुर्द), रंगनाथ कुशारे(सावरगाव), संदीप जाधव (रानवड) या प्रयोगशील शेतकऱ्यांचा खासदार भगरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक तुषार उगले यांनी कीड रोग व्यवस्थापना संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना मोरे म्हणाले, की १५ ते २० एप्रिल दरम्यान छाटण्या झालेल्या बागांमध्ये प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी बागा कमकुवत आहेत तेथे करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पानांवर करपा व डाऊनी सुदृश रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे त्यामुळे नियोजनपूर्वक रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. यापूर्वी करप्याच्या प्रादुर्भावामुळे प्रचलित अलसेलिनो एम्पलीना हा करपा यापूर्वी होता.

तर सध्या या करप्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून ‘कॉलेटोट्रीकम’ प्रजातीचा हा करपा बागेवर आहे. भोसले म्हणाले, की ६ मेपासून पाऊस सुरू असल्याने द्राक्षबागा अडचणीत आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने आगामी काळात उत्पादकता अडचणीत येईल. सध्या सूर्यप्रकाश पुरेसा नाही वाफसाही नाही. त्यामुळे निम्म्या बागा अडचणीत आहेत.

या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल. शिरसाठ म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीत सायबर फसवणूक वाढली असून द्वारे पैसे उकळले जात आहेत. या चर्चासत्रासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार म्हणतात, ‘‘ॲग्रोवन वाचलाच पाहिजे’’

’ॲग्रोवन’च्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान उपयुक्त माहिती मिळते. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रयोग घरबसल्या समजतात.म्हणून एकीकडे काम तर दुसरीकडे दररोज एक तास ॲग्रोवन वाचलाच पाहिजे असे खासदार भास्कर भगरे यांनी बोलताना आवर्जून नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Relief: राज्यात नुकसानीपोटी ३३७ कोटींची मदत

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

SCROLL FOR NEXT