Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season Preparation : खरीप तयारीच्या कामांना वेग

Pre-Monsoon Rain : पश्चिम पट्ट्यातील काही तालुक्यांचा अपवाद वगळता दोन दिवस अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने मशागतीच्या कामांना गती आली आहे.

Team Agrowon

Nashik News : आठवड्याभरापासून मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार सुरूवात केल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम पट्ट्यातील काही तालुक्यांचा अपवाद वगळता दोन दिवस अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने मशागतीच्या कामांना गती आली आहे.

मागील आठवड्यापासून मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी जमिनीत मशागतीला वेग देत बैल जोडी तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे करण्यास सुरुवात केली आहे. तर काही भागात मात्र जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा असल्याने मशागतीसाठी वातावरण बदलण्याची शेतकरी वाट बघत आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी बी बियाणे नियोजन व खते खरेदी सुरु झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यास शेतकरी पेरणी सुरू करतील. त्यादृष्टीने कृषी विभागाने तयारी सुरु केली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील नियोजनाच्या बैठका झाल्या आहेत.

आता बी-बियाणे, खते आणि इतर आवश्यक सामानाची खरेदी सुरू झाली आहे. काही शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे धावत आहेत, तर काही जन त्यांच्या स्वतः व्या पैशाने तयारी करत आहेत. शेतकरी बी-बियाणे, खते आणि इतरसामाग्रीची खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करत असल्याचे चित्र आहे,

माॅन्सूनपूर्व पावसाचा फटका

पश्चिम पट्ट्यातील पावसाळी तालुक्यात मात्र अजून अनेक भागातील शेतीत ओलावा कायम आहे. त्यामुळे इगतपुरी, नाशिकसह काही तालुक्यात पाउस उघडण्याची वाट पाहिली जात आहे. पावसाच्या पश्चिम पट्यात मान्सूनपूर्व वादळी वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

केरसाणे-दसाणेत मशागतींना वेग

नरकोळ : केरसाणे सह दुसाने, मुंगसे, पिंगळवाडे परीसरात पावसाने उघडीत दिल्याने खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीना वेग आला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. तुरळक पावसात टॅक्टरसह बैलजोडीने मशागती सुरु झाल्या आहेत. अठरा दिवसांपासून अवकाळीने अडथळा निर्माण झाला होता. हवामान अंदाजानुसार पुढील दिवसही पावसाचे राहतील. यामुळे शेतकरी अधिक काळजीत आहे.

आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस हा पूर्वमोसमी असून, मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता मशागत पूर्ण करून ठेवावी. मान्सून आल्यानंतर वाफसा स्थितीतच पेरणी करावी . ७५ मिलिमीटर ते १०० मिलिमीटर पाऊस झाला तरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
- ज्ञानेश्वर नाठे, कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT