Kharif Season 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Kharif Planning : खते, बियाण्यांच्या नियोजनाबाबत विक्रेत्यांना मार्गदर्शन

Cotton Seed : जिल्ह्यात यंदाही खरिपात चांगल्या प्रकारे पेरणी, कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. १५ मे पासून कापसाच्या बियाण्यांची विक्री सुरु होत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेत मिळावेत, यासह अन्य बाबीवर मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (ता. ९) जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील खते, बियाणे विक्रेते, कृषी विभागाचे अधिकारी, पंचायत समिती स्तरावरील गुणनियंत्रक निरीक्षक यांची खरीप हंगामपूर्वक कार्यशाळा झाली.

जिल्ह्यात यंदाही खरिपात चांगल्या प्रकारे पेरणी, कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. १५ मे पासून कापसाच्या बियाण्यांची विक्री सुरु होत आहे. आवश्यकतेनुसार बियाणे, खते उपलब्ध आहेत. ती शेतकऱ्यांना वेळेत पुरवठा व्हावीत यासाठी कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. ९) जिल्हा परिषदेत निविष्ठा विक्रेत्यांची कार्यशाळा झाली.

कृषी आयुक्तालयाच्या प्रतिनिधी ऋषाली देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड, जिल्हा बीज नियंत्रक अभंग, जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष छबूराव हराळ यांच्यासह पंचायत समिती स्तरावरील गुणनियंत्रक निरिक्षक, चारशेपेक्षा अधिक निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.

अनुदानित रासायनिक खतांचा प्रत्यक्ष साठा व पॉस मशीनमधील साठा समान असावा, भात पिकाच्या क्षेत्रामध्ये जून महिन्यात खताची आवश्यकता जास्त राहते, त्या दृष्टीने एप्रिल- मे मध्ये खतांचा साठा करून ठेवणे, जिल्हा, तालुक्याच्या जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताचा वापर व्हावा यासाठी प्रमुख पिकांच्या खत वापराची मात्रा असलेले बोर्ड ग्रामपंचायत, निविष्ठा विक्री केंद्रावर दर्शनी भागात लावणे, खत वापरांचा कलाची माहिती देणे, कृषी निविष्ठा विक्री करताना नमुन्यामध्ये बिल देणे, एमआरपी पेक्षा जास्त दराने निविष्ठा ची विक्री न करणे,

शेतकऱ्यास खतासोबत इतर खते अथवा निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती म्हणजेच लिंकिंग न करणे, विक्रेत्याने विक्रीसाठी उपलब्ध असलेला साठा, त्याचे दर दर्शनी भागात लावणे, सर्व निविष्ठा सुस्थितीत ठेवणे याबाबत कायद्यानुसार होणाऱ्या कार्यवाहीचे प्रशिक्षण देताना, साथी पोर्टलवरून बियाणे विक्री करिता प्रात्यक्षिक, आनुषंगिक माहिती, सोयाबीन बियाणे साठवणूक, विक्री करताना घ्यावयाची काळजी. एचटीबीटी कापूस बियाणे बाबत करावयाची कार्यवाही, अप्रमाणित अथवा बनावट कृषी निविष्ठांच्या वापरामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी करावयाच्या तक्रारी आदीबाबत मार्गदर्शन केले.

बियाण्यांची साथीवर विक्री

खताची यापूर्वीच पॉश मशिनवर खताची विक्री केली जात आहे. आता यंदापासून बियाण्यांची आधार कार्ड आधारित साथी अॅपवरून बियाण्यांची विक्री केली जाणार आहे. मान्यताप्राप्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाण्यांची विक्री व्हावी, बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची पूर्णतः काळजी कृषी विभाग घेत आहे. त्याच अनुषंगाने कार्यशाळा घेतली असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

Water Planning: पंचक्रोशीनिहाय जलनियोजनाची गरज

Vegetable Processing: फ्रेश-कट उद्योगासाठी कच्च्या मालाचे प्रक्रिया तंत्र

Universities Adopt Villages: महाविद्यालयांनी गावे दत्तक घ्यावी : राज्यपाल वर्मा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज माफ, ‘हेअर कट’ धोरणाचाही शेतकऱ्यांना लाभ

SCROLL FOR NEXT