Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Kharif Season 2025 : रिसोड, मालेगाव येथे खरीपपूर्व आढावा बैठका

Kharif Planning Meeting : खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्‌घाटन आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले.
Published on

Washim News : खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्‌घाटन आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. होत्या.

या वेळी तहसीलदार दीपक पुंड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामातील पीक योजना, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, जैविक शेती, खत व कीड व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश उंडाळ, उपसभापती संदीप घुगे, गजानन शिंदे, बबलू जैन, विनोद घुगे, संजय मांडवगडे, प्रिया पाठक, मनीषा घुगे, अजिंक्य मेडशीकर यांच्यासह राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कृषी विभागातील विविध योजनेची माहिती अमोल नवघरे यांनी दिली. प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी शुभम वाळूकर यांनी केले. धनंजय शितोळे यांनी आभार मानले.

Kharif Season
Kharif Season : बियाणे, खते, पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

रिसोडमध्ये आढावा

रिसोड येथे मंगळवारी (ता. ६) आढावा सभा तहसील कार्यालयाच्या सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक होते. प्रमुख उपस्थितांमध्ये कृषी उपसंचालक हिना शेख, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे, पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष गिरी, केव्हीकेचे शास्त्रज्ञ निवृत्ती पाटील होते.

Kharif Season
Kharif Season 2025 : खते व बियाण्यांचा सक्तीने पुरवठा केल्यास कारवाई ः बुवनेश्वरी. एस

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना लागणाऱ्या कृषी निविष्ठा, खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र, खरिपातील पिके, हंगामातील पेरणीचे नियोजन, अपेक्षित उत्पादन व उत्पादकता, खरीप हंगामासाठी बियाणे नियोजन, रासायनिक खताचा पुरवठा व मागणी, आपत्कालीन पीक नियोजन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आदीबाबत तावरे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.

हिना शेख यांनी खरीप हंगामात घेण्यात येणारी नावीन्यपूर्ण पिके तसेच शेती निविष्ठा, विविध योजनाबाबत शेतकऱ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. संतोष गिरी यांनी तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची बैठक घेऊन निविष्ठा विक्रीबाबत सूचना देणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com