Kharip Season Parbhani : परभणीतील शेतकऱ्यांचे काढणीपश्‍चात पीक विम्याचे वाटप रखडले

Flood Affect Farmers : स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ५० हजार २४७ शेतकऱ्यांना १०४ कोटी ७३ लाख रुपये वाटप झाले अजून २३ शेतकऱ्यांचे ४ लाख रुपये वाटप शिल्लक होते.
Kharip Season
Kharip Seasonagrowon
Published on
Updated on

Kharip Season : खरीप हंगाम २०२४ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेतील काढणीपश्‍चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिंग ः पी. एच) या जोखीमबाबीअंतर्गत पीकविमा दाव्यासाठी पात्र जिल्ह्यातील ९ हजार ३१७ शेतकऱ्यांना २४ कोटी १८ लाख रुपये एवढा विमा दावा मंजूर आहे. परंतु अद्याप एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. विमा कंपनी चालढकल करत असल्यामुळे पीकविम्याचे वाटप रखडले आहे. शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेतील विविध जोखीमबाबीअंतर्गत ७ लाख ३२ हजार ५८७ शेतकऱ्यांना ४२८ कोटी १८ लाख रुपये पीकविमा भरपाई मंजूर आहे. त्यात मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड-सीझन अॅडव्हर्सिटी) जोखीमबाबीअंतर्गत सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या संभाव्य विमा भरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेत अग्रिम (आगाऊ) विमा रक्कमेपोटी परभणी जिल्ह्यातील ६ लाख ७३ हजार शेतकऱ्यांना २९९ कोटी २३ लाख रुपये, स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज -एल.सी.) जोखीमबाबीअंतर्गंत ५० हजार २७० शेतकऱ्यांना १०४ कोटी ७७ लाख रुपये, काढणीपश्‍चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिग ःपी. एच.) ९ हजार ३१७ शेतकऱ्यांना २४ कोटी १८ लाख रुपये विमा भरपाईचा समावेश आहे.

Kharip Season
Parbhani Crop Damage: जोरदार वाऱ्यामुळे केळी,आंबा फळपिकांचे नुकसान

४०३ कोटी रुपयांवर विमावाटप...

मंगळवार (ता. ६) पर्यंत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जोखीमबाबीअंतर्गत ६ लाख ७० हजार २१७ शेतकऱ्यांना २९८ कोटी ७५ लाख रुपये विमा वाटप झाले अजून २ हजार ७८३ शेतकऱ्यांना ४८ लाख रुपये वाटप बाकी होते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ५० हजार २४७ शेतकऱ्यांना १०४ कोटी ७३ लाख रुपये वाटप झाले अजून २३ शेतकऱ्यांचे ४ लाख रुपये वाटप शिल्लक होते.

विमा कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी...

आयसीआयसीआय लोबार्डं विमा कंपनीकडून विमा रक्कमेचे योग्य गणना करून पात्र शेतकरी संख्या, मंजूर विमा रक्कम याबाबतची वस्तुनिष्ठ आकडेवारी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे सादर करणे अपेक्षित आहे. परंतु आकडेवारींमध्ये अनेक वेळा बदल केले. स्थानिक आपत्ती याजोखीमबाबीअंतर्गंत पीक नुकसानीच्या लाखो तक्रारी अपात्र ठरविल्या आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही असंख्य शेतकरी पिकविम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल शेतकरी तसेच पीकविमा अभ्यासकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

परभणी जिल्हा खरीप २०२४ काढणी पश्चात पीकविमा स्थिती

तालुका पात्र शेतकरी संख्या मंजूर रक्कम

परभणी १३१३ ४ कोटी १९ लाख रुपये

जिंतूर १५४ ३० लाख रुपये

सेलू ६४६ २ कोटी ८ लाख रुपये

मानवत २५९१ ५ कोटी ८७ लाख रुपये

पाथरी ९२७ २ कोटी २५ लाख रुपये

सोनपेठ २२ ९ लाख रुपये

गंगाखेड १३१४ ३ कोटी ९ लाख रुपये

पालम २१४६ ५ कोटी ७० लाख रुपये

पूर्णा २०४ ६१ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com