Prakash Ambedkar agrowon
ॲग्रो विशेष

Prakash Ambedkar : ऊसदराच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर शेतकरी नेत्यांवर भडकले

sandeep Shirguppe

Raju Shetti VS Prakash Ambedkar : प्रमुख ऊस पीक असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने मोडीत काढले जात आहेत. खासगीकरणाचा मास्टर प्लॅन तयार करून इथेनॉल निर्मितीही केली जात आहे.

उसाच्या किमान आधारभूत दरात इथेनॉल इंधनाचा समावेश केल्यास प्रतिटन दरात १०० रुपये इतकी वाढ होऊ शकते. तर सरकारच्या खिशात जाणारे वर्षाला १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडतील. मात्र, याबाबत भागातील बडे शेतकरी नेते काहीच बोलत नाहीत', अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅड. आंबेडकर हे एक दिवसीय इचलकरंजी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीशी युती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, एकूण १५ जागांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांचेच सूत अद्याप जुळलेले नाही. जागा वाटपांचे घोंगडे भिजत राहिले असून, ४८ पैकी २७ जागांवर निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी असल्याचे पत्र महाविकास आघाडीला दिले आहे.

सुरुवातीला महाविकास आघाडीने वंचितला जवळही केले नाही आणि आता पाठीमागे लागले आहेत. आमचा मतदार दरवर्षीं वाढतच आहे. लहान समुदाय, मुस्लिम मोठ्या प्रमाणात वंचितमध्ये आहेत. स्वतंत्र लढलो तर भाजप विरुद्ध वंचित अशीच लढाई होणार आहे. त्यामुळे ४८ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे.

जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षण व ओबीसी आंदोलनाचा फटका भूमिका न घेतलेल्या राजकीय नेत्यांना बसणार आहे. यामध्ये सर्वच पक्षांचे नेते वाहून जाणार आहेत.

तर भाजपसोबत वंचित जाईल

'जसे महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा प्रयत्न करतोय तशीच भूमिका भाजपबरोबर जाण्याचीही वंचित बहुजन आघाडीची आहे. जातीवर आधारित पुजारी यापुढे नकोत, असा प्रस्ताव आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पौरोहित्याचे शिक्षण घेतल्यानंतर पुजारी होण्यास मान्यता मिळावी. हे भाजपने अंमलात आणले तर त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी राहील,' अशी भूमिका असल्याचेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT