Warana sugar factory : वारणा साखर कारखान्याची १० लाख ९० हजारांची साखर चोरीने खळबळ

Vinay Kore Sugar Factory : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विक्रीसाठी पाठविलेली तीस टन साखरेची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Warana sugar factory
Warana sugar factoryAgrowon

Warana sugar factory Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडोली येथे असलेल्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विक्रीसाठी पाठविलेली तीस टन साखरेची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

साखर चोरल्याप्रकरणी ट्रकमालक, ट्रकचालक व एक साथीदार या तिघांवर अकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद ट्रान्सपोर्ट व्यावसायिक दिग्विजय बाळासो मल्लाडे (रा. दानोळी, ता. शिरोळ) यांनी कोडोली पोलिसांत दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिग्विजय यांचा श्री साईनाथ ट्रान्स्पोर्ट कंपनी, सांगली फाटा, शिरोली येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी गौतम शुगर ट्रेडिंग कंपनी, शाहूपुरी, कोल्हापूर यांची वारणा सहकारी साखर कारखान्यात सोमवारी (ता. ४) ट्रक (एमएच ५० एन ४७३३) मध्ये ३० टन वजनाची ६०० साखरेची पोती १०, ८९, ९००/- रुपये किमतीची साखर भरून ती ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीस द्यावयाची होती.

Warana sugar factory
Warana Cooperative Milk Union : वारणा सहकारी दूध संघास सर्वाधिक विक्रीसाठीचा पुरस्कार

शुक्रवार (ता. ८) पर्यंत माल ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीस न उतरता स्वतःच्या फायद्याकरिता फिर्यादीची फसवणूक करून अपहार केल्याबाबत ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल (रा. लक्ष्मीनगर, मलकापूर, ता. कराड), ट्रकचालक सिध्दांत गवंड व त्यांचा साथीदार मनोहर केदारे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com