Pune News : देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच्याआधी भाजपसह शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गट तयारीला लागले आहेत. तर राजकीय वजन असणाऱ्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी बैठकांचा जोर वाढवला आहे. याचदरम्यान मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे मंगळवार (३० रोजी) महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वंचितला आपल्यासोबत घेण्यावर एकमत झाले आहे. तर याबाबत मविआने तसे पत्र प्रकाश आंबेडकर यांना पाठवले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वंचितला मविआत घेण्यावरून फक्त चर्चा आणि बैठका होत होत्या. पण यावर कोणताही निर्णय होत नव्हता. दरम्यान महाविकास आघाडीला १५ दिवसांची मुदत वंचितकडून देण्यात आली होती. तर जागावाटपाबाबत निर्णय न घेतल्यास मविआचीही अवस्थाही इंडिया आघाडी सारखी होईल, असा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान आज वंचितला आपल्याबरोबर घेण्यासह जागावाटपावरही आजच्या मविआच्या बैठकीत चर्चा झाली. ज्यात वंचितला मविआमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील नेते, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित आहेत. तसेच या बैठकीत मराठावाड्यातील लोकसभेच्या जागावाटपही जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणतात...
दरम्यान मला अजूनही याबाबत महाविकास आघाडीचे कोणतेही पत्र आपल्याला मिळालेले नाही. ते मिळाल्यावर आपण यावर प्रतिक्रीया देऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
शिंदेंना ऑफर
हा निर्णय येण्याआधी प्रकाश आंबेडकर यांचे वाशिम येथील वक्तव्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत यावं अशी ऑफर दिली. तर फक्त आपली एकच अट असल्याचे म्हणत त्यांनी, शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी असे म्हटले आहे.
मुस्लिम मतदारांना आवाहन
तर वाशिममध्येच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करताना, मुस्लिम मतदारांना काँग्रेससोबत जाऊ नये असे आवाहन केले. तसेच काँग्रेसने हे दिले ते दिले म्हणत काँग्रेसच्या मागे न जाता आगामी लोकसभेकडे पाहावे असे म्हटले आहे. तसेच येत्या निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या जागांपैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर त्यांचे अर्ध्याहून अधिक ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.