Village Development : महिलांनी विविध क्षेत्रांत आपल कर्तृत्व सिद्ध केले

Aparna Thete : गाव, खेड्यांपासून शहरांपर्यंत विविध क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा स्वकर्तृत्वाने उमटवीत स्वतःला सिद्ध केल्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. असे विचार महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी व्यक्त केले.
Aparna Thete
Aparna TheteAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : अनेक गरजू महिलांपर्यंत आताही पोहोचणे शक्य होत नाही. असे असले तरी गाव, खेड्यांपासून शहरांपर्यंत विविध क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा स्वकर्तृत्वाने उमटवीत स्वतःला सिद्ध केल्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. असे विचार महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी व्यक्त केले.

ग्रामविकास संस्था रौप्य महोत्सव वर्ष, जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामविकास संस्था व ‘ॲग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सरपंच, ग्रामसेविका, उद्योजिका महिलांचा सत्कार व ग्रामीण महिलांकरिता स्वयंरोजगाराच्या संधी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपायुक्त थेटे बोलत होत्या.

Aparna Thete
Village Development : तयार करा गावाची कुंडली...

शुक्रवारी (ता. ८) ग्रामविकास भवन येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास संस्थेच्या अध्यक्षा जयश्री हदगल, सचिव नरहरी शिरपुरे, एमसीईडीच्या भारती सोसे, प्रवीण प्रशिक्षक अर्चना जिंदानी, ‘ॲग्रोवन’चे प्रतिनिधी संतोष मुंढे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून सचिव श्री. शिवपुरे यांनी ग्राम विकास संस्थेची २५ वर्षांची वाटचालीटचा ऊहापोह केला. उपायुक्त थेटे म्हणाल्या, की शिक्षण घेऊन शासकीय व खासगी सेवांमधून नोकरी करत महिला आपल्या जबाबदारीला न्याय देतात. त्याचप्रमाणे समाजकारण आणि राजकारणातही अनेक महिला काम करतात.

Aparna Thete
Village Development : पाणी, कृषी क्षेत्रामध्ये लोक शिक्षणाची गरज

त्यांच्यातील कर्तृत्व समजून घेतले, तर त्या स्वतःला सिद्ध करतात. ॲग्रोवनचे श्री. मुंढे यांनी ग्रामविकासाच्या कार्यासह ॲग्रोवनची एक शेतकऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून भूमिका विशद केली. ग्रामीण महिलांकरिता स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी प्रवीण प्रशिक्षक अर्चना जिंदानी यांनी, तर शासकीय योजना या विषयावर भारती सोसे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती उद्योजिका संगीता गायकवाड व अर्चना गरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

...यांचा झाला सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आदर्श गाव पाटोदाच्या सरपंच जयश्री दिवेकर, दुधडच्या सरपंच गंगासागर चौधरी, गणोरीच्या सरपंच सरला तांदळे, कुंबेफळच्या ग्रामसेविका संगीता तायडे, फरदापुर येथील उद्योजिका संगीता गायकवाड, चिखली येथील उद्योजिका रूपाली निकम, चितळी पुतळी येथील ग्रामसेविका अलका धांडे, परतूरच्या महिला संघटक अर्चना गरड यांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com