Poultry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : अतिदुर्गम भागात कुक्कुटपालन वरदान

Vice Chancellor Dr. Nitin Patil : आदिवासी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी वरदान आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजे स्वयंरोजगार, अन्नसुरक्षा आणि उदरनिर्वाहाचे भरभक्कम साधन आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी वरदान आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.

मेळघाटमधील चिलाटी (कुटीदा) या अतिदुर्गम भागात आयोजित केलेल्या आदिवासी महिलांच्या प्रशिक्षणादरम्यान डॉ. पाटील बोलत होते. अकोला येथील स्नातकोत्तर पदव्युत्तर संस्था आणि मेळघाट मित्र (मैत्री) या सामाजिक संघटनेच्या सहकार्यातून स्थानिक आदिवासी महिलांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे, कुक्कुटपालन विभागाचे विभागप्रमुख डॉ. सतीश मनवर, प्रकल्प समन्वयक डॉ. मंगेश वडे आणि स्थानिक संयोजक राम फड आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कुक्कुटपालन करताना व्यावसायिक आणि शास्त्रीय बाबींची माहिती असल्यास कुटुंबातील सर्व सदस्य दैनंदिन कामे सांभाळून अर्थार्जन करू शकतात. कोंबड्यांपासून मिळणारे अंडी व मांस उत्पादने किफायतशीर पद्धतीने स्थानिक बाजारपेठेत विक्रीयोग्य करण्याचे तंत्र पशुपालकांनी आत्मसात करावे.’’

डॉ. वडे यांनी प्रकल्पांतर्गत मेळघाटात करण्यात आलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. कुक्कुटपालन करताना पक्ष्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत डॉ. मनवर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अतिदुर्गम भागात अंडी आणि मांस उत्पादन कुपोषण कमी करण्यास मदत ठरेल, अशी अपेक्षा डॉ. पावशे यांनी या वेळी व्यक्त केली.

वीस महिलांनादेशी कोंबड्यांचे कुक्कुट गट वितरित

दरम्यान, २० महिला प्रशिक्षणार्थ्यांना देशी कोंबड्यांचे कुक्कुट गट, खाद्य, आवश्यक औषधसाठा आणि कुक्कुटपालन साहित्य वितरित करण्यात आले. प्रत्येक महिलेस वर्षभरात किमान १५०० अंडी उत्पादन करण्यास साहाय्यभूत होईल, अशा घटकांचे वितरण केले आहे. त्यामुळे या महिला कुक्कुटपालकांचा आर्थिकस्तर उंचावेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT