Poultry Farming : कुक्कुटपालनात बॅचनिहाय नियोजनावर भर

Poultry Business : या लेखात आपण कुक्कुटपालनातील बॅचनिहाय नियोजनाबद्दलची माहिती पाहणार आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

Poultry Farming Management :

शेतकरी नियोजन - कुक्कुटपालन

शेतकरी : राजेंद्र आनंदा मगर

गाव : वाखारी पिंपळगाव, ता. देवळा, जि. नाशिक

एकूण पक्षी क्षमता : १२ हजार

एकूण शेड : तीन

शेतीसाठी पाण्याची टंचाई असल्याने शेतीपूरक व्यवसाय करण्याचे राजेंद्र मगर यांनी ठरविले. त्यासाठी परिसरातील कुकुटपालन करणाऱ्या अनुभवी लोकांकडून माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत व्यवसायास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पक्षिक्षमता कमी होती.

मात्र टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करत गेले. सध्या त्यांच्याकडे एकूण तीन पक्षिगृह असून त्यात सुमारे १२ हजार पक्ष्यांचे संगोपन ते करत आहेत. मागील २४ वर्षांपासून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायात सातत्य राखले आहे.

Poultry Farming
Poultry Market : घाऊक बाजारात कोंबड्यांचे दर दबावात

बॅच नियोजन :

नवीन बॅच सुरु करण्यापूर्वी पक्षिगृहाची स्वच्छता व निर्जंतुक केले जाते. जेणेकरून नवीन बॅचमधील पक्ष्यांना आजाराची बाधा होणार नाही.

त्यानंतर बेडवर चुना मारून भाताचे तूस पसरले जाते.

पिल्ले शेडवर आणण्यापूर्वी खाद्य व पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते.

पिल्लांच्या संख्येनुसार खाद्य व पिण्याची भांडी यांची संख्या ठरविली जाते.

साधारण १ दिवस वयाची पिल्लांची खरेदी केली जाते. त्यानंतर चार ते पाच दिवस ब्रुडिंग करून विशेष लक्ष दिले जाते.

पक्ष्यांना वाढीच्या अवस्थेनुसार खाद्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. शास्त्रीय पद्धतीने संगोपन आणि व्यवस्थापन ह्या बाबी व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार औषधांच्या मात्रा दिल्या जातात.

गुणवत्तापूर्ण खाद्य पुरवठा :

ब्रॉयलर पक्ष्यांच्या वाढीसाठी संतुलित आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. जेणेकरून त्यांचे अपेक्षित वजन भरेल. त्यानुसार पक्ष्यांच्या वयानुसार खाद्य पुरवठा करण्यासाठी वेळापत्रक निश्चित केले जाते. खाद्यामध्ये सोया, मका यांचा संतुलित प्रमाणात वापर केला जातो. त्यात आवश्‍यक पूरक घटकांचे मिश्रण करून खाद्य तयार केले जाते. संपूर्ण खाद्य शेडवरच तयार केले जाते. त्यामुळे खाद्यावर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यास मदत होते. दर्जेदार आणि उत्तम प्रतीच्या खाद्याचा पुरवठा केल्यामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे पक्षी रोगाला बळी पडून होणारी मरतूक टाळली जाते.

Poultry Farming
Poultry Business : पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सोडवा, अन्यथा आंदोलन

व्यवस्थापनातील बाबी :

वर्षभरात साधारण पाच बॅच घेतल्या जातात. एक बॅच साधारण ४० ते ४८ दिवसांची असते.

बदलत्या हवामानानुसार पक्षिगृहातील व्यवस्थापनात बदल केला जातो.

स्वच्छता, निर्जंतुकीकरण, वातावरणीय बदलांनुसार योग्य नियोजन केले जाते.

खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

बाजाराच्या मागणीनुसार प्रत्येक बॅचचे नियोजन करून त्यानुसार विक्री नियोजन केले जाते.

बदलत्या ऋतूनुसार पक्षिगृहातील कामकाजामध्ये आवश्यक बदल केले जातात. शेडच्या बाजून पडदे लावले आहेत. पक्षिगृहातील दुर्गंधीमुळे तयार झालेल्या वायूमुळे पक्षी आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पक्षिगृहात हवा खेळती राहणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी वेळोवेळी पडदे खाली करून शेडमध्ये खेळती हवा खेळती राहील याची काळजी घेतली जाते.

पाणी व्यवस्थापन :

पक्ष्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांपासून पक्ष्यांचे संरक्षण होते. पाणी निर्जंतुक करण्यासह सामू नियंत्रित ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ला घेतला जातो. पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी पाण्याचा सामूची तपासणी केली जाते. पक्ष्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी पाणी शुद्धीकरण यंत्रणा (आरो प्लान्ट) बसविली आहे.

- राजेंद्र मगर, ९९२३१९०७०९

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com