Potato Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Crop : सातगाव पठार परिसरामधील बटाटा पीक फुलोऱ्यात

Potato Farming : सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरात खरीप हंगामात पाच हजार एकरांहून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे.

Team Agrowon

Manchar News : सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरात खरीप हंगामात पाच हजार एकरांहून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. सोमवारपासून (ता. ५) पावसाने उघडीप घेतली आहे. बटाटा पिकाची जोमदार वाढ सुरू झाली आहे. फुलोऱ्यात आलेल्या पिकाला किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणीची कामे वेगात सुरू झाली आहेत.

राज्यात सर्वाधिक बटाट्याची लागवड सातगाव पठार भागातील पेठ, पारगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव व खेड तालुक्यातील वाफगाव, वरुडे, जऊळके गावांत केली जाते. फुलोऱ्यात आलेल्या पिकाला सद्यःस्थितीत

किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती भावडीतील शेतकरी सोपान नवले यांनी दिली.

गेले काही दिवस सलग पाऊस सुरू होता. अनेक शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी काढून देण्याचे काम केले. वेेळीच पाऊस थांबला म्हणून बरे झाले, अन्यथा बटाटा पिकाला धोका निर्माण झाला असता. या भागातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. वेळेवर झालेल्या पावसामुळे बटाटा पीक तरारले आहे.
सारिका बाजारे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT