Crop Disease : गव्हाच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव

Wheat Crop : कानशिवणी परिसरात गव्हाच्या ओंब्यांवर अशा प्रकारची कीड दिसून आली असून, शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
Crop Disease
Crop DiseaseAgrowon

Akola News : गेल्या काही वर्षांत पिकांवर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून, यंदाच्या रब्बीत लागवड असलेल्या गव्हाच्या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात कानशिवणी परिसरात गव्हाच्या ओंब्यांवर अशा प्रकारची कीड दिसून आली असून, शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

जिल्ह्यात या वर्षात गव्हाची लागवड वाढलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १९२४१ हेक्टरच्या तुलनेत २२,२९४ हेक्टरवर लागवड झाली आहे. ११६ टक्के क्षेत्रावर ही पेरणी पोहोचली आहे. खरिपातील पिके जसजशी खाली झाली तशी गव्हाची लागवड झाली. यामुळे कुठे गहू ओंब्यांमध्ये, कुठे फुलोऱ्यात तर कुठे आता वाढीच्या अवस्थेत दिसून येत आहे.

Crop Disease
Crop Disease : रब्बी ज्वारीवर ‘लष्करी’, तर हरभऱ्यावर घाटे अळी

ज्या शेतांमध्ये गहू ओंब्या, फुलोऱ्यात आहे तेथे अळ्या दिसून येत आहेत. ही अळी खोडकिडी; असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गव्हाच्या पिकावर आजवर फारशी कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत नव्हता.या किडीमुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणामाचा धोका तयार झाला आहे.

Crop Disease
Crop Varieties : एकाच ठिकाणी गहू, हरभऱ्याच्या ६१ पीक वाणांची लागवड

पश्‍चिम विदर्भातील यंदाची लागवड

जिल्हा सरासरी लागवड टक्केवारी

अकोला १९२४१ २२२९४ ११६
बुलडाणा ५५३९६ ४६३८० ८४
वाशीम २५८२९ ३२७५० १२६
अमरावती ४२२३३ ३९५८० ९४
यवतमाळ ४०७२८ ४४६८८ ११०

गव्हावर खोडकिडा दिसतो आहे. याची अळी खोडात शिरून आतील भाग खाते. यामुळे शेंडा/पोंगा वाळतो आणि फुलावर असताना प्रादुर्भाव झाल्यास ओंब्या वाळतात, दाणे भरत नाहीत. या किडीच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम कीटकनाशक नाही. तथापि, गहू पिकावर मावा किड नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशक क्विनॉलफॉसची फवारणी करून या किडीचे नियंत्रण होऊ शकते.
डॉ. स्वाती भराड, वरिष्ठ शास्त्रज्ञ,गहू संशोधन विभाग, ‘पंदेकृवि’, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com