Popatrao Pawar letter over maratha reservation : राज्यात मराठा आरक्षण पेटले असून गावागावात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज आदर्शगावचे प्रवर्तक पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळे समाजात दुही निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे, असे पत्रात म्हटलं आहे.
हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार म्हणाले, गेली ५ वर्षे महाराष्ट्रात विविध समाजातील आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. त्यासाठी समाजात निर्माण झालेला असमतोलपणा हाच कारणीभूत आहे. त्यातून समाजात मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झालेली आहे. ज्यांना पूर्वीचे आरक्षण आहे. त्यांना आपले आरक्षण कमी होईल की काय याची भीती निर्माण होत आहे. ज्यांना आरक्षण मिळत नाही, ते आरक्षण मिळण्याची वाट पाहत आहेत. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.
ज्या राष्ट्रपुरुषांनी समाज संघटीत ठेवून परकीयांची आक्रमणे थोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार, अठरा पगड जातींना एकत्र घेऊन केलेला संघर्ष, तर जातीभेद विसरून इंग्रजांविरुद्ध लढलेली स्वातंत्र्याची लढाई, तर पेशव्यांनी रोवलेले अटकेपार झेंडे अशा परिस्थितीत एकीकडे शेतकरी दुष्काळाशी लढतो तर दुसरीकडे शेतमालाला बाजारभाव नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. शेतमालाला योग्य दर मिळत नाही म्हणून शेतकरी हतबल झाला आहे. नव्याने नोकरभरती होत नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. तर मुलांच्या शिक्षणासाठी शेतजमिनी विकाव्या लागत आहे. शेतकरी व शेतमजूर आर्थिकदृष्ट्या संकटात असून त्यातून ही परिस्थिती उद्भवली आहे असे मला वाटते
पवार यांनी पुढे म्हटले आहे, कुठेतरी समाज आणि राष्ट्रहितासाठी कटू निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कोणाला तरी याची किंमत मोजावी लागणार आहे, हे निश्चित आहे. तरी आपण सर्व समाजातील धुरिणांना एकत्र बोलावून सत्ताधारी व विरोधक एकत्र येत सर्वसमावेशक त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.