sandip kshirsagar house
sandip kshirsagar houseAgrowon

Maratha Reservation : राज्यभरात मराठा आंदोलनाचा उद्रेक!, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत वाढ

Maratha andolan : राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Published on

Increase in security of representatives : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज ७ वा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आणि औरंगाबादमधील भाजपचे आमदर प्रशांत बंब यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. मराठा आंदोलन चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्यावतीने तात्काळ सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

sandip kshirsagar house
Maratha Arakshan : मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घ्या ; महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीडमधील आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव नगरपालिकेच्या इमारतीलादेखील आग लावली. तसेच संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने बीडसह धाराशिवमध्ये संचार बंदीचे आदेश दिले आहेत. संचार बंदीचे आदेश असतानाही मराठा आंदोलक आक्रमक रस्त्यावर उतरत टायर जाळत आहेत. एसटी बस फोडल्याच्या घटना घडल्याने मराठवाड्यातील एसटी बस सेवा विस्कळीत आहे.

sandip kshirsagar house
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मराठवाड्यात १२ बस फोडल्या

मराठा आंदोलकाकडून लोकप्रतिनिधींना लक्ष केंद्रीत केले जात असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, छगन भुजबळ, रामदास कदम यांच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरातील संरक्षण वाढवण्यात आले आहे.

मराठा आंदोलनाबाबत सरकार गंभीर असल्याचा संदेश देत मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीच्या माध्यमातून मराठा आंदोलन, सद्य स्थिती आणि कायदा, सुव्यवस्था यांचा आढावा घेणार आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com