Pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Harvesting : दहा टक्के क्षेत्रावरील डाळिंब काढणी सुरू

Pomegranate Production : देशातील स्थिती; प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर

Team Agrowon

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली : देशातील डाळिंब उत्पादकांनी प्रतिकूल परिस्थितीत अंबिया बहरातील डाळिंबाच्या बागा साधल्या आहेत. सध्या दहा टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची काढणी सुरू झाली असून दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाला प्रति किलोस २० रुपयांनी दर अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मे- जून महिन्यात राज्यासह अन्य डाळिंब पट्ट्यात अति पाऊस झाला. पावसाचे पाणी बागेत साचले होते. त्यामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला असून फळ कुजव्याला सामोरे जावे लागत आहे. देशातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पाणी उपलब्ध करून ४५ हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा फुलविल्या आहेत.

जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून डाळिंबाची काढणी सुरू झाली आहे. या दरम्यान मुंबई, दिल्ली, बंगलोर या बाजारपेठेत डाळिंबांची विक्री सुरू झाली आहे. सध्या बाजारपेठेत डाळिंबाला चांगली मागणी असून उठावही चांगला होत आहे. दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर मिळत आहे. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो ७० ते ८० रुपये असा दर आहे.

सध्या डाळिंब काढण्यासाठी फारशी गती नाही. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून काढणीला गती येईल. या बहरातील डाळिंबाची विक्री दिवाळीपर्यंत सुरू राहते. गतवर्षी हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाला प्रतिकिलो १०५ ते ११० रुपये दर होता. यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने डाळिंबाचा दर्जा चांगला आहे.

बांगलादेशात हजार टन डाळिंब
देशांतर्गत बाजारपेठेसह डाळिंबाची विक्री बांगलादेशात होऊ लागली आहे. अंबिया बहरातील अंदाजे एक हजार टन डाळिंब बांगलादेशात विक्रीसाठी पोहोचली आहेत, अशी माहिती डाळिंब संघाने दिली.

यंदा प्रतिकूल परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी दर्जेदार डाळिंब पिकवली आहेत. डाळिंबाची विक्री सुरू झाली असून गतवर्षीपेक्षा चांगले दर मिळत आहेत.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष,
अखिल भारतीय डाळिंब संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Support: एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Sharad Pawar Farmer Relief Demands: दुष्काळप्रश्‍नी पवारांकडून सरकारकडे १७ मागण्या

Rabi Irrigation: खडकवासला धरणातून रब्बीचे आवर्तन सुरू

Animal Rabies Vaccination: राज्यात २.५८ लाख प्राण्यांचे रेबीज लसीकरण

Drought Water Management: दुष्काळात पाण्याचे काटेकोर नियोजन हवे: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT