POCRA Agrowon
ॲग्रो विशेष

Pocra Scheme : ‘पोकरा योजना' ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

गेल्या मार्च २०१८मध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यांत सुरू करण्यात आला.

Team Agrowon

Yavatmal News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Project) जिल्ह्यात ३०२ गावांसाठी फायदेशीर ठरत आहे.

या प्रकल्पातून जिल्ह्यातील सात हजार ३६५ शेतकऱ्यांना स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ मिळाल्याने या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केली आहे.

गेल्या मार्च २०१८मध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यांत सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासोबत, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचतगटांसाठी सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात हा प्रकल्प १६ तालुक्यांतील ३०२ गावांमध्ये राबविला जात आहे. त्यात पाच हेक्टरपर्यंच्या शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.

जिल्ह्यातील १२ हजार ८३० शेतकऱ्यांना या योजनेतून आतापर्यंत विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यात १२ हजार ५४० शेतकऱ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे. त्यातील निम्या शेतकऱ्यांनी सिंचनासाठी स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ घेतला आहे.

सहा हजार ३७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्प्रिंकलर संच, तर ९९३ शेतकऱ्यांना ठिबक संचासाठी अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन

पोकरा’ योजनेतून आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी लाभ देण्यात येतो. शिवाय बदलत्या पर्यावरणाला तोंड देण्यासाठी बीबीएफ पॉलिहाऊस, शेडनेटसारखे तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

या योजनेतून परसबाग कुक्कुटपालन, वर्मी कंपोस्ट, नाडेप, कंपोस्ट आदी युनिटसाठी, तसेच ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक अवजारे, शेततळे, फळबाग, फुलशेती लागवड, वनशेती, मत्स्यशेती, रेशीम शेतीसाठी साहाय्य देण्यात येते.

योजनेनिहाय लाभार्थ्यांची संख्या

कुक्कुटपालन लाभार्थी एक, नाडेप कंपोस्ट ८४, ठिबक संच ९३१, अवजारे २६३, शेततळे ४६, बीबीएफ १,४७२, फळबाग ३२१, मत्सशेती-दोन, पॉलिहाऊस पाच, रिचार्ज विहिरी पाच, बीजोत्पादन १,०६०, रेशीम शेती २६, शेडनेट १६, स्प्रिंकलर ६,३७२, पंप ७६३, विहिरी १५०, पाइप्स ६१३, खारपान शेती ३०७, इतर ३८ अशाप्रमाणे एकूण १२ हजार ५४० शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT