PoCRA Project : पोकरा प्रकल्पाने राजंदा गावात घडवला बदल

राज्यातील १५ जिल्ह्यांत २०१८ पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्प राबवला जात आहे.
PoCRA Project News
PoCRA Project NewsAgrowon
Published on
Updated on

Akoala News : हवामान बदलाच्या (Climate Change) काळात शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्याचे परिणाम दिसून येत आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा या गावात विविध घटकांचा थेट शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याची जबाबदारी कृषी यंत्रणेने घेतली. त्यामुळे गावात फळबाग, शेडनेट, सूक्ष्म सिंचन, यंत्र, अवजारांचा लाभ घेतलेले शेतकरी शेतीत फायदेशीर ठरू लागले.

राज्यातील १५ जिल्ह्यांत २०१८ पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचा पहिला पाच वर्षांचा कालावधी जवळपास पूर्णत्वास आल्याने शासनाने आता दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली आहे.

PoCRA Project News
Climate Change : हवामान बदलास पूरक शेती पद्धतीचा अवलंब करावा

पहिल्या टप्प्यांत काही ठिकाणी चांगली कामे झाली आहेत. प्रामुख्याने राजंदासारख्या छोट्या गावात विविध घटकांचा लाभ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे भेटीदरम्यान दिसून आले. या गावात कृषी यांत्रिकीकरणाचा २२ शेतकऱ्यांना लाभ दिल्या गेला.

चार शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली. २५ हेक्टरवर प्रकल्पातून फळबाग उभी राहिली. २८४ जणांनी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतला. दोघांनी शेतीपूरक डाळ मिलचा व्यवसाय थाटला. तर एका शेतकऱ्याने शेडनेट उभारून त्यात सिमला मिरचीचे उत्पादन सुरू केले आहे.

राजंदा या गावात पोकरा योजनेचे विविध घटक प्रभावीपणे राबवल्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ३४१ घटकांसाठी सुमारे एक कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांचे अनुदान दिल्या गेले. आणखी काही घटक प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात हे एक आदर्शवत काम झाले आहे.
विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी, बार्शीटाकळी, जि. अकोला
अर्ध्या एकरात पोकरा प्रकल्पांतर्गत ५२ बाय ४० आकाराचे शेडनेट उभारले. यामध्ये आता मी सिमला मिरचीची लागवड केली आहे. या परिसरात पहिले शेडनेट असून, यासाठी १३ लाख ४० हजार ४०३ रुपये खर्च झाला आहे. कृषी खात्याने सुमारे ८ लाख रुपयांची मदत केली. यातून मोठा हातभार लागला.
जगदेव घोंगे, शेडनेटधारक शेतकरी, राजंदा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com