Indian Politics: उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप!
Uttar Pradesh Election: नेतृत्वगुण आणि वक्तृत्वामुळे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले असले, तरी भाजपतील सुप्त संघर्षाचा फटका त्यांना बसू शकतो. त्या संघर्षाचा किती परिणाम निवडणुकीत होतो, हे पाहावे लागेल. दिल्ली-लखनौच्या संघर्षाचा मुद्दा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव सातत्याने मांडत आहेत. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत त्यांची लोकप्रियता वधारलेली नाही.