POCRA Project : पोकरा प्रकल्पातून वाशीम जिल्ह्यातील १२ हजार ४७८ शेतकऱ्यांना लाभ

कृषी विकासाचा दर लक्षणीयरीत्या घटत आहे. घटत्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांनी तणावग्रस्तता वाढत असून, काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलले.
POCRA Project
POCRA ProjectAgrowon
Published on
Updated on

Washim News : हवामान बदलाच्या (Climate Change) काळात शेतकरी सक्षमपणे उभा राहावा या उद्देशाने राबवल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाची (Nanaji Deshmukh Agriculture Sanjivani Project) जिल्ह्यात विविध तालुक्यांत १४९ गावांत अंमलबजावणी केली जात आहे.

या गावातील १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना विविध २८ घटकांचा लाभ देऊन त्यांच्या बँक खात्यात ३२ कोटी ९० लक्ष ७६ हजार रुपयांचे आतापर्यंत अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मागील काही वर्षांत अवकाळी पाऊस व गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, तीव्र दुष्काळ किंवा टंचाईसदृश परिस्थिती होऊन त्याचा परिणाम कृषी उत्पादन व उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात होत आहे.

परिणामी, कृषी विकासाचा दर लक्षणीयरीत्या घटत आहे. घटत्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांनी तणावग्रस्तता वाढत असून, काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलले.

अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी हा प्रकल्प संबंधित गावांसाठी संजीवनी देणारा ठरत आहे.

POCRA Project
PoCRA Project : पोकरा प्रकल्पाने राजंदा गावात घडवला बदल

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या जिल्ह्यातील १४९ गावांच्या १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना ३२ कोटी ९० लक्ष ७६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. सर्वाधिक ५८९९ शेतकऱ्यांना तुषार संचासाठी अनुदान देण्यात आले.

१३७७ शेतकऱ्यांना फळबाग योजनेचा लाभ देण्यात आला. ३४ शेतकऱ्यांनी वृक्ष लागवड, २० शेतकरी मधुमक्षिकापालन, दोन शेतकरी परसातील कुक्कुटपालन, तीन बांबू लागवड करणारे, सहा शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे, सहा व्यक्तिगत शेततळे, १११ विहिरींचा लाभ, १०६१ शेतकऱ्यांना ठिबक संच, चार शेतकऱ्यांना शेततळे अस्तरीकरणाचा लाभ दिला गेला. शिवाय ४४४ शेतकऱ्यांची शेतीशाळा होस्ट फार्मर म्हणून निवड झाली होती.

याशिवाय कृषी यांत्रिकीकरण १०७, नाडेप १, पाइप ६७८, फळबाग १३७७, पॉलिहाउस १, बीजोत्पादन १८०२, बीबीएफ तंत्रज्ञान प्रोत्साहन ५२, विहीर पुनर्भरण ७२ रेशीम उद्योग ३, शेडनेट हाउस १३, शेळीपालन ३१, तुषारसंच ५८९९ आणि पंप संचाचा ७५१ अशा एकूण १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत पोकरा प्रकल्पांतर्गत लाभ देण्यात आला आहे.

पोकरा प्रकल्पात येणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देऊन कृषी उत्पादन व उत्पादकतेत वाढ करीत त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com