PM Kisan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

PM Kisan Scheme Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पी. एम. किसान योजनेच्या लाभापासून राज्यातील अद्यापही १३ हजार ३३५ खाती आधार लिंक झाली नाहीत.

sandeep Shirguppe

PM Kisan Scheme Adhar Link : कोल्हापूर जिल्ह्यात पी. एम. किसान योजनेच्या लाभापासून राज्यातील अद्यापही १३ हजार ३३५ खाती आधार लिंक झाली नाहीत. पी. एम. किसान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत आहे. परंतु तांत्रीक अडचणीमुळे अद्यापही जिल्ह्यातील १३ हजार ३५३ शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक झालेले नाही. यामुळे योजनेच्या लाभापासून हे शेतकरी वंचीत राहणार आहेत.

याबाबत कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना बँकेमध्ये संपर्क करून बँक खाते आधारशी लिंक करावे. अथवा पोस्टात खाते काढावे; अशी माहिती देण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात पी. एम. किसान योजनेचे ४ लाख ६५ हजार ९५० शेतकरी लाभ घेत आहेत. केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेअंतर्गत पोर्टलवर चुकीने अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी निर्देश दिले आहेत. यामध्ये ४ हजार ०९९ लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे.

बँक खाते आधारशी लिंक नसलेले १३.३५३ लाभार्थी आहेत. यामध्ये लाभार्थ्यांचा लागवडयोग्य मालकी हक्क १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा असणे आवश्यक असून यासाठी जमीन नोंदीचा फेरफार, सातबारा जोडावा लागेल. मयत लाभार्थीच्या वारसांबाबत मयताचे नाव एक फेब्रुवारी २०१९ पूर्वीची जमीन धारणा असणे आवश्यक असून फेरफार आणि जमीन वारस नोंदीचा फेरफार अशी कागदपत्रे द्यावी लागतील.

एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत नसणे; यामध्ये कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड पती, पत्नी व १८ वर्षाखालील अपत्ये यांची कागदपत्रे द्यावी लागतील. ग्राम स्तरावर नोडल अधिकारी कृषी सहाय्यक असून कृषी सहाय्यकांचे लाभार्थीनिहाय भौतिक तपासणी प्रमाणपत्र द्यावे लागेल. नवीन लाभार्थ्यांसाठी नोंदणी सीएससी केंद्रावर बंद असून कृषी सहायकांकडे ॲपमधून करावी लागेल.

जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे म्हणाले की, बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा, अथवा पोस्टात खाते काढावे. ई-केवायसी पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांनी पीएम किसान जीओआय ॲपद्वारे कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून ई-केवायसी ऑथेंटीकेशन करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

SCROLL FOR NEXT