Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde : तापमान बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आगामी काळात तापमान वाढ कमी करण्याची गरज आहे. सरकार त्या दृष्टीने पावले उचलत आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘पर्यावरण बदल आणि तापमान वाढीच्या काळात पर्यावरण संरक्षण आणि कृषी यांचे संतुलन राखणे काळाची गरज आहे. तापमान बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आगामी काळात तापमान वाढ कमी करण्याची गरज आहे. सरकार त्या दृष्टीने पावले उचलत आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १८) केले.

जागतिक बांबू दिनानिमित्त वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमतर्फे मुख्यमंत्री शिंदे यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार एससीपीएच्या सभागृहात प्रदान करण्यात आला.

CM Eknath Shinde
Climate Change : बदलत्या वातावरणामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘आजच्या काळात अन्न सुरक्षा महत्त्वाची आहे. लोकांचे पोट भरण्याचे महत्त्वाचे काम शेतकरी करतो. त्यामुळे त्याला अन्नदाता म्हणतात. शेतकरी आणि शेती महत्त्वाची आहे. वातावरण बदल आणि तापमान वाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळेच तापमान वाढ कमी करणे ही गरज आहे. त्यातही राज्य शासनाने पर्यावरण कृती समितीची स्थापना केली आहे.

राज्यात २१ लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पूर, अतिवृष्टी, दुष्काळ या सारथ्य नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी हा नवीन बदलांनाही स्वीकारत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. सिंचनाच्या १२५ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे ही शासनाचे उद्दिष्ट आहे.’’

CM Eknath Shinde
Climate Change : तापमान वाढीवर वृक्षारोपण हाच उपाय

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, ‘‘राज्यातल्या कृषी विद्यापीठांमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञानाविषयी संशोधन करण्यात येत आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक सुबत्ता निर्माण करत असल्याचा सार्थ अभिमान आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील यशाचे आणि शाश्‍वत शेतीतील प्रयोग आणि प्रयत्नांचे जागतिक पटलावर प्रतिबिंबित करणारा आहे. दुष्काळ, पाण्याची कमतरता, पूर आणि हवामान बदल यांसारख्या असंख्य आव्हानांनंतरही, महाराष्ट्राने आपली ताकद आणि अनुकूलता दाखवली आहे.’’

वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे उपाध्यक्ष विल्यम दार यांनी प्रस्तावनेमध्ये पुरस्काराचे स्वरूप आणि निवड पद्धती याविषयी माहिती दिली. जागतिक कृषी परिषदेचे राष्ट्रीय संचालक एम. जे. खान यांनी व्यक्त आभार मानले. या वेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, ‘वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम’चे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंगे, फोरमचे आशिया प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. विलियम्स दार, आफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष प्रो. लिंदवे सिंबादा, अमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. केनिथ क्वीन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com