Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

MLA Ravindra Dhangekar : कृषी खात्याच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातील एक कथित गैरव्यवहार दडपल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे पत्र आमदार रवींद्र धंगेकर यांनी कृषी आयुक्तांना पाठविले आहे.
MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra DhangekarAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी खात्याच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातील एक कथित गैरव्यवहार दडपल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे पत्र आमदार रवींद्र धंगेकर यांनी कृषी आयुक्तांना पाठविले आहे.

पुण्याच्या कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार धंगेकर हे सतत वेगवेगळे गैरव्यवहार उघडकीस आणल्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी कृषी आयुक्तालयाकडे मोर्चा वळविल्यामुळे अधिकारी वर्गात चलबिचल निर्माण झाली आहे.

MLA Ravindra Dhangekar
Sugar Factory Mismanagement : घोडगंगा कारखान्याच्या गैरकारभार चौकशी करा

निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील अधिकाऱ्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत आमदार धंगेकर यांनी आयुक्तांसह कृषी सचिव जयश्री भोज तसेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे विभागाचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांना पत्र पाठवले आहे.

MLA Ravindra Dhangekar
Agriculture Input Case : हरलेल्या न्यायालयीन दाव्यांची चौकशी सुरू

‘‘कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी ३५.४४ लाख रुपयांची वसुली करण्याची कारवाई प्रस्तावित केली होती. परंतु, कारवाई करण्याऐवजी या अधिकाऱ्याला पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. तत्कालीन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीदेखील या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाई सुरू केली होती. मात्र, कृषी आयुक्त कार्यालय व मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दडपला आहे,’’ असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

कृषी आयुक्तालयातील दक्षता पथकाचे तत्कालीन प्रमुख किसन मुळे यांनी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातील आठ कोटींच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे नमुद केले आहे. तसा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे दिला गेला. परंतु, हा अहवाल आस्थापना शाखेने दडपला. एका तत्कालीन आयुक्तानेदेखील या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन फौजदारी कारवाई व्हावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com