Roshan Talape
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. हे सहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपयांप्रमाणे दिले जाते.
योजनेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, आणि जमिनीच्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे (DBT) पाठवली जाते.
तर या योजनेसाठी बँक खात्यासाठी लागणारी e-KYC घरबसल्या कशी करावी ते जाणून घेऊयात.
सगळ्यात प्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे.
त्यानंतर होमपेज वरील e-KYC हा पर्याय निवडावा.
e-KYC पर्यायावर १२ अंकी आधार नंबर टाकून सर्च हा पर्याय निवडून पुढे जावे.
त्यानंतर या योजनेसाठी दिलेल्या नोंदणी क्रमांकावर एक ओटीपी येईल त्याचा वापर करुन सबमिट या पर्यायावर जावे.
शेवटी ई-केवायसी यशस्वी असा संदेश आल्यानंतर ई-केवायसी पुर्ण झालेली असेल.
Organic Farming : चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब; सेंद्रिय शेतीचे 'हे' फायदे पाहा