Orchard Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Plantation : ‘रोहयो’तून 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवड

Employment Guarantee Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ही योजनतून फळबाग लागवड करण्यासाठी यंदा (२०२४-२५) सलग चौथ्या वर्षी साठ हजार हेक्टरचे उद्दिष्ट निश्‍चत केले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ही योजनतून फळबाग लागवड करण्यासाठी यंदा (२०२४-२५) सलग चौथ्या वर्षी साठ हजार हेक्टरचे उद्दिष्ट निश्‍चत केले आहे. त्यासाठी कृषी सहायकांनी पुढाकार घ्यावा याबाबत कृषी विभागाकडून सूचना दिल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी (२०२३-२४) ३८ हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली, मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाऊस नसल्याचा फळबाग लागवडीवर परिणाम झाला.

यंदा चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी पुढे यावे म्हणून कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे. नगर, नाशिकसह दहा जिल्ह्यांत फळबाग लागवडीवर अधिक जोर राहणार असल्याचे दिसते आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करावी यासाठी शासनाकडून अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) व पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबवली जात आहे.

बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड करतात. राज्यात गेल्या तीन वर्षांत दर वर्षी प्रत्येकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. लागवडीला मोठा प्रतिसाद मिळत प्रत्येक वर्षी चाळीस हजार हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत फळबाग लागवड झाली. राज्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस नसल्याने २०२३-२४ मध्ये ३८ हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली. त्यामुळे यंदाही (२०२४-२५) राज्यात ६० हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते.

साधारण जूनच्या मध्यांपर्यंत खड्डे खोदून जूनला पावसाळा सुरू झाला, की फळबाग लागवडीला सुरुवात होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत बऱ्यापैकी लागवड उरकली जावी अशा पद्धतीने कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे. यंदा कृषी विद्यापीठासह कृषी विभागाच्या रोपवाटिकेतही फळरोपे बऱ्यापैकी उपलब्ध आहेत.

फळबाग लागवड अधिक प्रमाणात व्हावी यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. राज्यात सुमारे १० हजार ६२० कृषी सहायक आहेत. यंदा निश्‍चित केलेल्या उद्दिष्टात सर्वाधिक नाशिक, रत्नागिरी, पालघर, यवतमाळ, नगरसह पुणे, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, जळगावला उद्दिष्ट अधिक आहे.

जिल्हानिहाय फळबाग लागवडीचे उद्दिष्ट (हेक्टर)

ठाणे ः १,५००, पालघर ः २,६००. रायगड ः २,२००, रत्नागिरी ः ३,०००, सिंधुदुर्ग ः २,४००, नाशिक ः ३,५००, धुळे ः १,०००, नंदुरबार ः २,५००, जळगाव ः१,८००, नगर ः २,७००, पुणे ः २,५००, सोलापूर ः २,५००, सातारा ः २,७००, सांगली ः १,२००, कोल्हापुर ः ६००, छत्रपती संभाजीनगर ः १,५००, जालना ः १,८००, बीड ः १,०००, लातूर ः १,५००, धाराशिव ः १,०००, नांदेड ः १,०००, परभणी ः १,५००, हिंगोली ः ६००, बुलडाणा ः २,०००, अकोला ः १,२००, वाशीम ः १,८००, अमरावती ः २,५००, यवतमाळ ः ३,०००, वर्धा ः १,४००, नागपूर ः १,७००, भंडारा ः १,७००, गोंदिया ः १,७००, चंद्रपूर ः १,७००, गडचिरोली ः ७००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT