Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा कमी

Banana Production : खानदेशात सातपुड्यालगत अनेकदा वादळी पाऊस, गारपीट अशी समस्या होते. यामुळे केळी बागा रावेर वगळता अन्य भागांत कमी होत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सातपुड्यालगत अनेकदा वादळी पाऊस, गारपीट अशी समस्या होते. यामुळे केळी बागा रावेर वगळता अन्य भागांत कमी होत आहेत. यंदा उष्णतेचा या भागांत बागांना मोठा फटका बसल्याने बागा कमी झाल्याची स्थिती आहे.

सातपुड्यालगत कांदेबाग केळीची लागवड कमी दिसत आहे. तसेच यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील काही भागांत मृग बहर केळीही कमी आहे. काही गावांतच परंपरेने सातपुड्यालगत केळी पीक घेतले जात आहे. परंतु अन्य भागांत केळी पीक वाढलेले नसल्याची स्थिती आहे.

यंदा चढ्या तापमानामुळे मे अखेरीस व जूनमध्ये घराबाहेर निघणे कठीण झाले होते. उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसला आहे. यावल, चोपडा तालुक्यांतील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अनेक केळीबागा करपल्याने यंदा नुकसान झाले. यामुळे या भागात केळी काढणी कमी होत आहे. कारण उष्णतेत अनेक बागा काढाव्या लागल्या.

तापमानामुळे केळी पिकाची वाताहत झाली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी वादळी पाऊस, गारपीट होते. यात मोठी हानी होते. यंदाही ही हानी झाली होती. अलीकडेच किंवा सप्टेंबरमध्येही रावेरमध्ये वादळी पावसाने सातपुड्यालगतच्या भागात केळी बागा आडव्या झाल्या आहेत.

मार्च ते जून या कालावधीत सातपुडालगत मोठी हानी होत असते. या भागात केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. शेतकरी आधुनिक शेतीद्वारे केळीचे चांगले उत्पादनही घेतात.

परंतु दरवर्षी विविध भागात उष्णता व अन्य नैसर्गिक समस्या येतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मे व जूनचे काही दिवस या भागांत पारा ४० ते ४५ अंशांपर्यंत गेला होता. उष्णतेची लाट निर्माण झाली होती. तसेच वादळी पाऊसही झाला. फळपीक विमा योजनेतून फारशी भरपाईही मिळत नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT