Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : रिसोड तालुक्यात खरिपाचे ७० हजार हेक्टरवर नियोजन

Kharif Season : खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यावर्षी मॉन्सून वेळेत दाखल होणार असून सरासरी एवढा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Washim News : तालुक्यात या वर्षी खरीप हंगामासाठी ७० हजार ५०० हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, सोयाबीन व हळद लागवड वाढण्याची शक्यता आहे. हळदीची लागवड सरासरीपेक्षा तिप्पट होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यावर्षी मॉन्सून वेळेत दाखल होणार असून सरासरी एवढा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले असून गाव पातळीवर शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यासाठी सभा घेतल्या जात आहेत.

यावर्षी तालुक्यात ७० हजार ५०० हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी उशिरा झालेली पेरणी, सोयाबीनवर किडीचा प्रादूर्भाव तसेच अतिवृष्टीमुळे झालेले सोयाबीनचे नुकसान, बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता. आता ही मरगळ झटकून शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज होत आहे. खरीप पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांची बी-बियाणे, खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली .

असे राहील लागवड क्षेत्र

मागील वर्षी सरासरी ५४ हजार ४७० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. या वर्षी ५६ हजार ६९३ हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. कपाशीचे क्षेत्र सरासरी मागील वर्षाएवढेच आहे. तुरीच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन १२०१८ हेक्टरवर नियोजन आहे. मागील वर्षी सरासरी ७५० हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र हळदीच्या लागवडीमध्ये तीन पट वाढ होऊन २१०० हेक्टरवर लागवड नियोजित आहे.

हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

गतवर्षी हळदीचे क्षेत्र केवळ ७५० हेक्टर होते. यावर्षी मात्र हळदीला चांगला भाव आल्यामुळे सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी हळदीच्या लागवडीकडे वळत आहेत. हळदीच्या लागवडीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी दोन हजार हेक्टरचा पल्ला गाठला आहे.

खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कृषी केंद्र संचालकांनाही सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी शक्यतो घरगुती असलेले बियाणे उगवण क्षमता तपासूनच व बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावे.
- मगनदास तावरे, तालुका कृषी अधिकारी, रिसोड, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT