Kharif Season : बुलडाण्यात तूर, मका वाढणार, तर सोयाबीन घटणार

Crop Production : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने पीक लागवडीचे नियोजन केले असून यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात थोडी घट होईल, तर मक्याचे क्षेत्र वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.
Crop Production
Crop ProductionAgrowon

Buldana News : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने पीक लागवडीचे नियोजन केले असून यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात थोडी घट होईल, तर मक्याचे क्षेत्र वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. हंगामाच्या अनुषंगाने बुलडाणा तालुक्यात गावागावांत शेतकऱ्यांच्या सभा घेऊन बीजप्रक्रीया, खतवापर, किडरोग व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती दिली जात असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी दिली.

Crop Production
Kharif Season 2024 : खरीप आढावा ४ जूननंतरच

बुलडाणा तालुक्यात खरिपात ५७ हजार ४२२ हेक्टर पेरणी क्षेत्र असून गेल्यावेळी सोयाबीन ५० हजार ४१८ हेक्टरवर लावण्यात आली होती. तुरीचे क्षेत्र २३४०, मका १७३०, उडीद १६६, मूग १०२ आणि कपाशी ९५८ हेक्टरवर पेरणी झाली होती.

यंदा अशी राहील पेरणी

सन २०२४-२५ च्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड गेल्यावेळपेक्षा घटून ४८,५०० हेक्टरपर्यंत होईल. तर तुरीची लागवड वाढून ३,८५० हेक्टर, मका २,२५०, उडीद ६६६, मूग ६००, कपाशी ८८५ हेक्टरवर पेरणी होऊ शकते. यादृष्टीने कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील बियाणे खते व कीटकनाशके निविष्ठांची वितरण व विक्री सुरळीत होण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

Crop Production
Kharif Sowing : यंदा सव्वासहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्याला १२० हेक्टरचा लक्षांक प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांना विविध अवजारे, ट्रॅक्टर व ठिबक, तुषार या घटकांचा लाभ घेण्यासाठी डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थींनी नोंदणी करावी.

गाव सभांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत संपूर्ण तालुकाभर गावनिहाय शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम व सभा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये बियाण्याची प्रतवारी, बीजप्रक्रिया व उगवणशक्ती तपासणी करण्याबाबत सखोल मार्गदर्शन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात याचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. सुरडकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com