Bhavana Gawali Agrowon
ॲग्रो विशेष

Bhavana Gawali : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सूक्ष्म नियोजन करा

Suggestion of MP Bhavna Gawali : शेती उत्कृष्ट करण्यासाठी झटणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना खासदार भावना गवळी यांनी केल्या.

Team Agrowon

Washim News : शेती उत्कृष्ट करण्यासाठी झटणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना खासदार भावना गवळी यांनी केल्या. येथे आयोजित पाच दिवशीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आत्मा प्रकल्प संचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव गुरुवार (ता. १५) पर्यंत भरवण्यात आला आहे.

या महोत्सवाचे उदघाटन खा. गवळी यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, कृषी सभापती वैभव सरनाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय चातरकर, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी गणेश गीरी, संतोष पोफळे, निलेश मलिक, प्रमोद गंगावणे, महादेव ठाकरे आदी उपस्थित होते.

खासदार गवळी म्हणाल्या, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांचा शेतमाल विकला गेला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी दर्जेदार पिकाचे उत्पादन करावे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत करावी. कृषी क्षेत्राबरोबर उद्योग वाढीसाठी देखील सुक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात पिकवल्या जाणाऱ्या शेतमालावरील प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात झाले पाहिजे. शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी सोसायटी व कंपनी यांच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. सेंद्रीय भाजीपाला पिकवण्याची गरज आहे, बचत गट सक्षम केले पाहिजे, सूचना देखील खा. गवळी यांनी यावेळी केल्या.

चंद्रकांत ठाकरे म्हणाले, की कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शासनाची आहे. केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. वाशीम जिल्हा हा ‘मार्केंटिग जिल्हा’ कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे. वाशिम जिल्हा संत्रा लागवडीत पुढे येत आहे. संत्रा लागवड व प्रक्रिया आणि बीज उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. वाशिममध्ये चिया लागवडीला चालना द्यावी.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. म्हणाल्या, की जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. त्यांची व्याप्ती वाढवायची आहे. सामूहिक शेतीची गरज आहे. शेतमालाचे ग्रेडिंग केले पाहिजे. शेतमालाचा दर्जा राखावा लागेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम करण्यात येईल. जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. वैभव सरनाईक यांनीही मोलाचे केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

Soybean Farming: खेडच्या पूर्व भागामध्ये सोयाबीनला नवसंजीवनी

Kharif Season Crisis: पिके तहानली; उपसाबंदीने शेतकऱ्यांची कोंडी

Agriculture Department Staffing Plan: कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द

Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा

SCROLL FOR NEXT