PM Kisan : प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता `पीएम किसान`चा लाभ मिळणार

PM Kisan : प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नव्हता.
PM Kisan
PM Kisanagrowon
Published on
Updated on

PM Kisan Farmers : केंद्र सरकारकडून पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना ३ हप्त्यांत एकूण ६ हजार रुपये दिले जातात. परंतु जे शेतकरी प्राप्तिकर (Income Tax) भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. परंतु आता केंद्र सरकारने या नियमात थोडा बदल केला आहे.

पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पीएम किसानच्या यादीत प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश होणार आहे.

मात्र, केंद्र सरकारने एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकीत हप्त्यांसह १६ वा हप्ता देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेबाबत केंद्र सरकारने मागच्या ४ वर्षात अनेक बदल केले.

जे शेतकरी कर भरतात त्यांना त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ज्याचे उत्पन्न जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता. त्यामुळे या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांकडून या लाभाची वसुली करण्यात आली.

PM Kisan
PM Kisan : पीएम किसानची रक्कम वाढणार का? कृषी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

पीककर्जासाठी या शेतकऱ्यांकडून बँकांनी फॉर्म १६ भरून घेतल्याने हे शेतकरी प्राप्तिकराच्या मयदित आले होते. मात्र, शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ मिळणे बंद झाले होते. मात्र, अशा शेतकऱ्यांकडून आता ही थकबाकी वसूल केली जाणार नाही. तर, त्यांना यापूर्वीचे लाभ देण्यासही केंद्र सरकारने सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात लाखो शेतकरी प्राप्तिकराच्या माध्यमातून पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहत होते. परंतु सरकारने नियमात बदल केल्याने लाखो शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार होता. मात्र, काही कारणास्तव तो आता महिनाअखेरीस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पीएम किसान केवायसी कशी करावी

१) सर्वप्रथम ‘PMKISAN Gol’ हे App डाउनलोड करून घ्यावे. तत्पूर्वी, जुने PMkisan App डिलिट करून पुन्हा PMkisan App २.०.० हे ॲप्लिकेशन Install करावे. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी व हिंदी यापैकी एक भाषा निवडा.

२) स्क्रीनवर New Farmer Registration आणि Login यापैकी ‘पीएम किसान’ योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. अॅप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.

३) स्क्रीनवरील Login Type मधील Beneficiary पर्याय निवडून ‘पीएम’ किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाद्वारे Login करण्यासाठी GET OTPॉ बटणावर क्लिक करा.

योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाइलवर आलेला चारअंकी OTP टाकून Login करावे. त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वतःचा सहा अंकी MPIN तयार करावा. MPIN च्या माध्यमातून लाभार्थ्यास App मध्ये Login करणे व e-KYC करणे सोयीचे होईल.

४) ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून Login केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असल्यास "Your e-KYC is pending for completion" असा संदेश दिसेल. त्यानंतर Click here to complete your e-KYC यावर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहाअंकी MPIN तेथे टाकावा.

त्यानंतर Consent Form वर क्लिक करून Scan Face वर क्लिक करा. त्यानंतर समोर FaceRD App is not installed on device असा संदेश येईल आणि त्यावर Ok म्हणा.

त्यानंतर गुगल प्ले स्टोअर Aadhar FaceRd (Early Access) हे App Install करण्यासाठी उपलब्ध होईल ते Install करा. त्यानंतर मोबाइलमध्ये Capturing Face सुरू होईल, त्या वेळी आलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटणावर क्लिक करावे.

५) मोबाइल समोर धरून चेहऱ्यावर प्रकाश दिसेल, अशा पद्धतीने Scan Face या बटणावर क्लिक करा. त्यानंतर Images captured successfully processing असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल. म्हणजेच लाभार्थ्याचे e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले.

इतर लाभार्थीचे e-KYC करण्यासाठी Dashboard वरील e-KYC for other beneficiaries'' या बटणावर क्लिक करा आणि वरीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केल्यास आपली प्रक्रिया पूर्ण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com