Delhi Farmers Protest : आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा बळाचा वापर ; अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या

Tear Gas Fired On Farmers : हमीभावाच्या कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाच्या पाश्वभूमीवर देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे कूच केली आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Farmers Protest In Delhi : हमीभावाच्या कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाच्या पाश्वभूमीवर देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे कूच केली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारही अॅक्शनमोडवर आल्याचे दिसत आहे. मात्र, सरकारसोबतची प्राथमिक चर्चा फिस्कटल्याने शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो' मोर्चा सुरू केला आहे.

आंदोलनासाठी शेतकरी दिल्लीच्या शंभू, खनौरी-जिंद आणि डबवाली सीमांवर पोहचले असून शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरूवात केली आहे. पंजाब, हरियाणातून येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या शंभू सीमेवर मोठ्या संख्यने शेतकरी जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहे.

Farmers Protest
Delhi Farmers Protest : दिल्ली आंदोलनावर शेतकरी ठाम ; शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारची धावाधाव

शेतकऱ्यांवर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

पंजाब, अंबालाच्या दिशेने दिल्लीत येणाऱ्या मार्गावरील शंभू सीमेवर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनावर ठाम असणाऱ्या शेतकरी शंभू सीमेवर पोहचताच पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात येत आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचीही माहिती आहे.

Farmers Protest
Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांची 'पुन्हा' दिल्लीकडे कूच ; एमएसपी समितीनं आत्तापर्यंत काय काम केलं?

२०२० सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

२०० हून अधिक शेतकरी संघटनांचे शेतकरी जर दिल्लीत आले, तर पुन्हा एकदा २०२० च्या आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण होवू शकते. यासाठीच पोलिसांकडून शेतकऱ्यांना दिल्लीबाहेरच रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे शेतकरी दिल्लीकडे निघाले असले तरी, सरकारसोबत त्यांची चर्चा सुरू आहे.

पाच तासांची चर्चा निष्फळ

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत चंदीगडमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, कृषीमंत्री अर्जून मुंडा यांच्यासोबत शेतकरी संघटनांची चर्चा झाली. मात्र, चर्चेतून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. सरकारचे मंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये तब्बल पाच तासांहून अधिक वेळ चर्चा झाली.

पंजाबातून शेतकरी रवाना

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखेर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. पंजाबमधील फतेहगढ साहिब येथून शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो' मोर्चा सुरू केला असून पंजाबमधून शेतकऱ्यांना घेऊन जाणारे डझनभर ट्रॅक्टर शंभू सीमेवर पोहोचले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com