Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Pest : भातपिकावर किडींचा प्रादुर्भाव

Crop Pest Management : ऑगस्टपासून पावसाची तीव्रता व कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे. वातावरण हे भातपिकाच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असले, तरीही पिकावरील किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

Wangaon News : ऑगस्टपासून पावसाची तीव्रता व कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे. वातावरण हे भातपिकाच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असले, तरीही पिकावरील किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी भातशेतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भातावरील खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी या किडींसाठी अनुकूल वातावरण असून या किडींचा प्रादूर्भाव उद्भवण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवस मध्यम पावसाची शक्यता असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५ सेंमीपर्यंत नियंत्रित ठेवावी. काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत असल्याने भातखाचरात पाण्याची पातळी पाच ते दहा सेंमीपर्यंत नियंत्रित करावी. बांध तणमुक्त ठेवावे, जेणेकरून किडीची खाद्य वनस्पती नष्ट होऊन भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.

संकट गडद होण्याआधीच भातशेतीचे नियोजन करून वातावरणानुसार कृषी विज्ञान केंद्राने सुचवलेल्या उपाययोजनांवर वेळोवेळी भर देऊन अंमलात आणाव्यात, असा सल्ला पीक संरक्षणतज्ज्ञ प्रा. उत्तम सहाने यांनी दिला आहे.

शेतातील सुरळ्या नष्ट करा...

पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी या दोन किडींचा प्रादुर्भाव काही भागात आढळून येते. उंचावरील भात खाचरातून पाणी वाहत येऊन खालच्या भातशेतात येते, अशा शेतामध्ये दोन्ही किडींचा प्रादूर्भाव जास्त आढळून आला आहे. यालाच स्थानिक भाषेत शेतकरी बग्या रोग म्हणतात.

2या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २० मिली किंवा लॅमडा-सायहेलोथ्रीन ५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा. सुरळीतील अळीच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी बांधून पिकावरून एक जाड दोर ओढत न्यावा, जेणेकरून सुरळ्या पाण्यात पडतात आणि शेतातील पाणी फोडून लावावे. त्यानंतर एकत्र जमा झालेल्या सुरळ्या नष्ट कराव्यात.

किडीवर नियंत्रण हवे

ढगाळ वातावरणामुळे भात पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. किडीच्या नियंत्रणासाठी कारटॉप हायड्रोक्लोराइड २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खोडकिडींची अंडीपुंज पानाच्या टोकावर असतात, त्यामुळे शेतात कामगंध सापळे लावावेत.

 रोगापासून वाचवा

भातपिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल किंवा कार्बनडाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जिल्ह्यात कीड व रोग व्यवस्थापनाच्या अभावामुळे भात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येते. महागडी औषधांची फवारणी करून अधिक खर्च होण्यापेक्षा कीड व रोग यांचा प्रादुर्भाव आटोक्यात राहील व उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी.
- प्रा. उत्तम सहाने, पीक संरक्षणतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: अर्णब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा इशारा; पाच दिवसांचा अंदाज काय? 

Dal Mill Subsidy Scheme: डाळ मिल सुरू करण्यासाठी सरकार देतंय २५ लाखांपर्यंत अनुदान; पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Soil Health Management: शेतजमिनीचे आरोग्य जपून पीक उत्पादन खर्च कमी करा : डॉ. आर. एल. काळे

Smart Model Village: ‘स्मार्ट मॉडेल व्हिलेज’मधून बोरगाव वसूमध्ये होतोय कृषी विकास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिवाळीआधी दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये एकत्र मिळणार का?

SCROLL FOR NEXT