Lok Sabha Election 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात शांततेत मतदान

Election Update 2024: जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ या तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील मतदानास सोमवारी (ता.१३) सकाळी सात मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

Team Agrowon

Pune Lok Sabha News : जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ या तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील मतदानास सोमवारी (ता.१३) सकाळी सात मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाचे सावट आहे. तरीही नागरिकांनी मतदान करण्यासाठी सोमवारी सकाळपासून पुढाकार घेतला होता.

मतदानासाठी पुणे शहर व जिल्ह्यात एकूण दोन हजार ५०९ केंद्रे होती. जिल्ह्यात एकूण २५ लाख ३९ हजार मतदार होते. पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि त्यांचे पती विश्राम कुलकर्णी यांनी मतदान केले.

शिरूर मतदारसंघात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर मतदार संघाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकंडवार यांनी मतदान केले.

पुणे मतदार संघात तिरंगी लढत असून यामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात सामना आहे. तर, शिरूरमध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत आहे. मावळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सकाळी सात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत पुणे मतदार संघात सर्वाधिक ६.६१ टक्के, मावळमध्ये ५.३८ टक्के, तर शिरूरमध्ये ४.९७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर काही प्रमाणात गर्दी वाढल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत पुण्यात १६.१६ टक्के मतदान झाले होते. शिरूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे १४.५१ टक्के, तर मावळमध्ये १४.८७ टक्के मतदानाची नोंद झाली.

त्यानंतर मतदान करण्यासाठी नागरिकांचा ओघ सुरूच होता. तिसऱ्या टप्प्यात पुणे मतदार संघात एक वाजेपर्यंत २६.४८ टक्के, तर शिरूरमध्ये २०.८९ टक्के, मावळात २७.१४ टक्के, तर चौथ्या टप्प्यात तीन वाजेपर्यंत पुणे मतदार संघात ३३.०७ टक्के मतदान झाले, शिरूरमध्ये ३६.४३ टक्के, मावळमध्ये ३६.५४ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी उमेदवारांना नावाची शोधाशोध करावी लागली.

जिल्हाधिकाऱ्यांचे वेबकास्टिंगद्वारे बारकाईने लक्ष :

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र गंगवार आणि विशेष पोलिस निरीक्षक एन. के. मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील विशेष नियत्रंण कक्षाला भेट देवून कामकाजाबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वत: जिल्हाधिकारी वेबकास्टिंगच्या माध्यमातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगद्वारे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मतदान केंद्रावर समस्या निर्माण झाल्यास त्यावर तत्काळ कार्यवाहीच्या सूचना नियंत्रण कक्षातून देण्यात येत होत्या.

जिवंत मतदारांच्या नोंदी झाल्या मृत

पुणे लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी आवश्यक पुरावे घेऊन उत्साहाने गेलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव मृत असे नोंदविल्याचे आढळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. युवक क्रांती दल, भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते संदीप बर्वे यांना आणि काँग्रेसच्या बुथवरील कार्यकर्त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. मतदान केंद्र क्र.१८८, महात्मा फुले पेठ, शाळा नंबर ९५, खोली नंबर २ येथे मतदानासाठी आलेल्या ५ जणांच्या बाबतीत मृत नोंदी असल्याचे दुपारी १२ वाजेपर्यंत आढळले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT