Maharashtra Lok Sabha Election : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान; अनेक ठिकाणी बंद पडले ईव्हीएम मशीन

Maharashtra Lok Sabha Election 2024 : राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. १३) सुरू झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात २२.१२ टक्के मतदान झाले आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मदतान होत असून सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात २२.१२ टक्के मतदान झाले असून सर्वात कमी अहमदनगर जिल्ह्यात १४.७४ टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे भर उन्हात मतदारांना ताटकळत थांबावे लागले आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Lok Sabha Elections 2024 : राज्यात मतदानाचा जोर वाढला; हातकणंगलेमध्ये राडा, इंदापुरात आमदाराची कार्यकर्त्याला शिवीगाळ, धाराशिवमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू

रावेर - १९.०३ टक्के

शिर्डी -१८.९१ टक्के

जळगाव- १६.८९ टक्के

बीड - १६.६२ टक्के

पुणे - १६.१६ टक्के

मावळ -१४.८७ टक्के

अहमदनगर- १४.७४ टक्के

शिरूर- १४.५१ टक्के

दरम्यान चौथ्या टप्प्यातील मतदानाला जोर धरला असून जालन्यासह विविध ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले. यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला असून जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १४ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने माजी खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तसेच त्यांनी आपल्या पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास निवडणूक अधिकाऱ्यांकडून मज्जाव करण्यात आल्याचा आरोप केला.

जालन्यात मशीन बंद पडलं

जालन्यात लोकसभेसाठी मतदान सुरू असतानाच विविध अशा तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले. यावेळी पैठण मतदान केंद्रावरील पूर्ण संच बदलण्याची वेळ निवडणूक विभागावर आली. तसेच . अंबड तालुक्यातील अमलगाव, भोकरदन शहरात असणाऱ्या एका मतदान केंद्रावर मशीन बंद पडले. ते सुरू केल्यानंतर मतदान प्रकिया पुन्हा सुरू झाली

Maharashtra Lok Sabha Election
Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

ग्रामस्थांनी बंद पाडलं मतदान

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील मतदान केंद्र थेट ग्रामस्थांनी बंद पाडले. तर येथील रहिवाश्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांवरच आरोप केला की ते कमळ चिन्हावर मतदान करण्याच्या सूचना करत आहेत. यावरून येथे वातावरण तापले असतानाच तहसीलदार थेट मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.

पुण्यात मतदारांचा खोळंबा

पुण्यातील मॉडेल कॉलनी मतदान केंद्रासह विद्या भवन शाळेतील मतदान केंद्र आणि पुण्यातील वडगाव शेरी भागातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले. यामुळे मतदारांना थांबावे लागले. मॉडेल कॉलनी मतदान केंद्रावर मतदारांना तब्बल २५ मिनिटे बसून राहावे लागले होते. तर वडगाव शेरी भागातील केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण युनिट बदलावे लागले. तर टिंगरेनगरमधील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमधील केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदानसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

जुन्नरमध्ये मशीन सुरू VVPAT बंद

जुन्नरमध्ये मतदानाला जोर धरत असतानाच मतदान केंद्र क्रमांक १४ येथे VVPAT मशीन बंद पडले. यामुळे येथे मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. यावरून माजी खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तसेच कोल्हे यांनी, आपल्या पोलिंग एजंटला केंद्रावर उपस्थित राहण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केल्याचा आरोप केला. कोल्हे यांनी ही तक्रार ईमेलवरून करताना, निवडणूक आधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष द्यावे, असे म्हटले आहे.

दरम्यान रावेर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मतदारांसहित पोलिसांची धावपळ उडाली. रावेरमधील सौ. कमलाबाई यश अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना प्रचंड ढगांच्या गडगडात आणि कडकडाटसह हलका पाऊस सुरू झाला. यामुळे बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धावपळ झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com