Water Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Barrage : ठाणे जिल्ह्यातील पाझर तलाव गाळमुक्त

Water Management : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करताना सहा गाव व पाझर तलावांमधून तब्बल २१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे.

Team Agrowon

Thane News : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करताना सहा गाव व पाझर तलावांमधून तब्बल २१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. त्यामुळे या गाव व पाझर तलावात २१ हजार क्युबिक मीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. येत्या काही महिन्यांत आणखी ४२ तलावांतील गाळ काढण्यात येणार आहे.

ठाण्याला धरणांचा जिल्हा असे म्हटले जाते. मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारे मोठी धरणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात वर्षांनुवर्षे पाणी टंचाई आणि नापिकीच्या झळा शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावपाड्यांना सोसाव्या लागत होत्या.

या परिसरात उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र, टँकरने केला जाणारा पाणीपुरवठाही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे या गावांची तहान भागत नाही. गाळमुक्त धारण, गाळमुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाझर तलावामुळे पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीसह सिंचन क्षेत्रात वाढ होणे, हातपंप, कुपनलिका, दैनंदिन कामांसाठी पाणी मिळणार आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत सहा तलावांतील गाव व पाझर तलावांतून २१ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता दिलीप जोकर यांनी दिली. त्यामुळे तितकाच पाणीसाठा निर्माण झाला असून, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना

जिल्ह्यातील पाणी स्त्रोताचे बळकटीकरण करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यात ५० गाव तलाव आणि पाझर तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन ठिकाणी गाळ काढण्याचे कामही सुरू केल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Agriculture Mortgage Loan : ‘शेतीमाल तारण’साठी औसा बाजार समितीचे पहिले पाऊल

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला

8th Pay Commission: ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठवा वेतन आयोग 'या' दिवशी लागू होणार

Rabi Sowing : लातूर विभागात पंधरा लाख हेक्टवर रब्बीचा पेरा

SCROLL FOR NEXT