
Nashik News : येथील गाय नदी पावसाअभावी सलग चार वर्षांपासून कोरडीठाक असून, शेतीवर परिणाम होत आहे. मागील वर्षी ओव्हरफ्लोचे पाणी इतरत्र मुबलक फिरले. परंतु गाय नदीवरील बंधाऱ्यांपर्यंत ते पोहोचलेच नाही. किमान यंदातरी या नदीवरील सर्व बंधारे, चारी क्रमांक २८ व २९ ला ओव्हरफ्लोचे पाटपाणी सोडून नाले, बंधारे भरून देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत.
जळगाव नेऊर ग्रामपंचायतीनेही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ओव्हरफ्लोच्या पाण्याने बंधारे भरून देण्याची मागणी केली आहे. पाटोदा ते नेऊरगावच्या शिवारात या नदीवर असलेले असंख्य बंधारे आजही कोरडेठाक आहेत.
त्यामुळे किमान हजारांपर्यंत विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठल्याने शेतीवर परिणाम झाला आहे. भविष्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे बंधारे पालखेडच्या ओव्हरफ्लो पाण्याने भरून देण्यासाठी परीसरातील शेतकरी वर्ग टाहो फोडत आहे.
पावसाळा संपण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने या कालावधीत पाऊस न झाल्यास दुष्काळाचा सामना करावा लागतो कि काय अशी भिती आहे. विहीरी, कूपनलिकांनी तळ गाठल्याने जनावरांना पाणी कुठून आणावे हा प्रश्न आहे. पाण्याअभावी शेती होणार नाही ते वेगळेच संकट.
गाय नदीनंतर पालखेड कालव्याच्या वितरीका तारणहार ठरत होत्या. सध्या पिण्यासाठी पालखेड आवर्तनातून असलेला राखीव कोटा वाढविण्यात आल्याने शेतीसाठी असलेले काही आवर्तन कमी करण्यात आले आहे. वितरीका क्र.२८ व २९ वर आलेले पाटपाणी शेती सिंचनानंतर नदीतील आरक्षित बंधारे भरून देण्यासाठी वापरले जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.