Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम रक्कम अदा करा

Advance Crop Insurance : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण संभाव्य विमा रकमेपैकी २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्याचे आदेश दिले.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम अदा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

मंगळवारी (ता. २२) या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला होता. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण संभाव्य विमा रकमेपैकी २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली नाही.

त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी तर्फे ठिय्या मांडला. या वेळी विमा कंपनीच्या अधिकारी म्हणाले, की केंद्र व राज्य सरकारच्या हिश्‍शाचा विमा हप्ता जमा होत नाही तोपर्यंत पीकविम्या अग्रिम रक्कम जमा करू शकत नाही.

रविवार (ता. २७)पर्यंत विम्याची रक्कम जमा नाही झाली तर सोमवारी (ता. २८) संपूर्ण जिल्ह्यात ‘चक्का जाम’ करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला.

या वेळी गजानन तुरे, सय्यद कलीम, मुंजा लोडे, माउली शिंदे, किशन शिंदे, विठ्ठल चोखट, रणजित चव्हाण, नामदेव काळे, सुंदर गरुड, नृसिंह पवार यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT