Ayush Prasad Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के अग्रिम भरपाई द्या

Crop Insurance Scheme : तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत मागील भरपाई देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे बैठकीत दिले.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.

तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत मागील भरपाई देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे बैठकीत दिले.

गुरुवारी (ता.१९) अल्पबचत भवन येथे कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपसंचालक चंद्रकांत पाटील, आत्माचे कृषी उपसंचालक पांडुरंग साळवे, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कर्ज व अनुदान मिळवून देण्यासाठी बॅंका व शेतकऱ्यांचा संयुक्त मेळावा घेण्यात यावा. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर मेळावा आयोजित करण्यात यावा.

या मेळाव्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या लाभार्थ्यांना ही सहभागी करून घेण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात जिल्ह्यात कमीत कमी ५०० लाभार्थ्यांना लाभ पोचला पाहिजे.

कृषी उत्पादनापासून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. पीक उत्पादनाच्या खपासाठी मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तृणधान्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT