Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : दोन लघू तलाव पडले कोरडे

Water Storage In Parbhani : जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पाणलोटात जोरदार पाऊस न झाल्यामुळे जिंतूर तालुक्यातील चिंचोली आणि आडगाव हे दोन लघु तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील १४ लघु तलावातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. ६ लघू तलावात ३.७७४ दलघमीनुसार ९ टक्के तर दोन मध्यम प्रकल्पात ७.४११ दलघमीनुसार १४ टक्के पाणीसाठा होता.

जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.

मे महिन्यातील जोरदार मॉन्सूनपूर्व पावसामुळे कोरड्या पडलेल्या लघु तलावात पाणीसाठा जमा झाला होता. परंतु जून मध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला. जुलै मध्येही पावसाचे प्रमाण अल्प आहे. अधून मधून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत नाही.

मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा...

करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे. गुरुवारी (ता. १०) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात १.७९८ दलघमीनुसार ७ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ५.६१३ दलघमी नुसार १९टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

दोन मध्यम प्रकल्पातील सरासरी पाणीसाठ्यात १ टक्क्यांनी वाढ होऊन सरासरी ७.४११दलघमीनुसार १४ टक्के पाणीसाठा होता. २०२४मध्ये १० जुलै रोजी करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १४ टक्के पाणीसाठा होता. मासोळी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली होता.

१४ लघू प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली...

गुरुवारी (ता. १० ) घेतलेल्या नोंदीनुसार मागील आठवड्यात कोरडा असलेल्या भोसी (ता. जिंतूर) लघु तलावातील पाणीसाठा जोत्याखाली आला. तर जोत्याखाली पाणी असलेले चिंचोली व आडगाव येथील लघु तलाव कोरडे पडले. पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळगाव, कोद्री(ता.गंगाखेड), देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा, केहाळ, भोसी, कवडा, दहेगाव, मांडवी (सर्व ता. जिंतूर) या १४ तलावातील पाणीसाठाजोत्याखाली आहे.

वडाळी (ता. जिंतूर) येथील लघु तलावात १० टक्के, पाडाळी (जि. जालना) येथील लघु तलावामध्ये ११ टक्के पाणीसाठा होता. झरी (ता. पाथरी) येथील लघु तलावामध्ये ६५ टक्के,राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील लघुतलावात १० टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील लघु तलावामध्ये ३८ टक्के तरतांदुळवाडी (ता. पालम) येथील लघु तलावामध्ये ८ टक्के पाणीसाठा होता. २०२४ मध्ये १० जुलै रोजी लघु प्रकल्पांमध्ये सरासरी २.००३ दलघमी (२ टक्के) पाणीसाठा होता. त्यावेळी २ लघु तलाव कोरडे पडले होते तर १३ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT